शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

आम्ही देशाचं संरक्षण करतो, तुम्ही लोकांची हत्या, कॅप्टन अमरिंदर यांचा पाक लष्करप्रमुखांवर निशाणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2018 16:36 IST

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी सोमवारी डेरा बाबा नानक- करतारपूर साहिब कॉरिडोरची पायाभरणी केली आहे.

ठळक मुद्देउपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी सोमवारी डेरा बाबा नानक- करतारपूर साहिब कॉरिडोरची पायाभरणी केलीया कार्यक्रमात पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांवर निशाणा साधला आहे.पाकिस्तानचे सेना प्रमुख बाजवा मला खूप ज्युनिअर आहेत. मी मुशर्रफ यांनाही सीनिअर आहे.

अमृतसर- उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी सोमवारी डेरा बाबा नानक- करतारपूर साहिब कॉरिडोरची पायाभरणी केली आहे. यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. या कार्यक्रमात पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांवर निशाणा साधला आहे.कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले, मी कमर बाजवा यांना सांगू इच्छितो की, मीसुद्धा एक जवान आहे हे त्यांनी विसरू नये. पाकिस्तानचे सेना प्रमुख बाजवा मला खूप ज्युनिअर आहेत. मी मुशर्रफ यांनाही सीनिअर आहे. प्रत्येक जवानाला माहीत असतं की, दुसरा जवान काय विचार करतो. आम्ही नेहमीच देशाचं संरक्षण करू इच्छितो. परंतु तुम्हाला हे कोणी शिकवलं की लोकांची हत्या करा, अमृतसरचे लोक कीर्तन करत आहेत. तर तिकडे ग्रेनेडनं हल्ले करत आहेत, असं म्हणत पाकच्या लष्कर प्रमुखांनी पाकिस्तानवर निशाणा साधला आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी करतारपूर साहिब कॉरिडोरसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे आभार मानले. शिखांची जुनी मागणी आज पूर्ण झाली आहे. करतारपूर साहिब कॉरिडोरवर आम्ही गुरु नानक देव यांच्या नावे मोठा द्वार बनवू इच्छितो. आम्ही याचं नाव करतारपूर द्वार ठेवणार आहोत.

(आठवं आश्चर्य... मोदी सरकारच्या निर्णयाचं चक्क पाकिस्तानकडून कौतुक!)

कसं असणार करतारपूर साहिब कॉरिडोर?करतारपूर साहिब कॉरिडोरअंतर्गत दिल्ली-करतारपूर रस्ता तयार करण्यात येणार आहे. हे काम पाकिस्तानला लागून असलेल्या सीमावर्ती भागात करण्यात येणार आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे भारतीय नागरिकांना पाकिस्तानातून वाहत येणाऱ्या रावी नदीच्या किनारी असलेल्या गुरुद्वारा करतारपूर साहिब जाण्याची सुविधा मिळणार आहे. त्यामुळे भारतीय तीर्थ यात्री त्या पवित्र ठिकाणी जाऊ शकतील. करतारपूर साहिब शिखांचे प्रथम गुरु गुरुनानक देव यांचं निवासस्थान आहे. गुरुनानक यांनी स्वतःच्या आयुष्यातील 17 वर्षं 5 महिने 9 दिवस इथे घालवले होते. त्यानंतर त्यांचं कुटुंबीय तिथे वास्तव्याला आलं. त्यांच्या आई-वडिलांचं निधनही तिथेच झालं आहे. त्यामुळेच शिखांसाठी हे श्रद्धास्थान आहे. केंद्र सरकार गुरुदासपूर जिल्ह्यातून आंतरराष्ट्रीय सीमेपर्यंत करतारपूर कॉरिडोरचं निर्माण करणार आहे. जिथे सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या कॉरिडोरच्या माध्यमातून लोकांना करतारपूर साहिब जाण्यास मदत होणार आहे. भारतानं पाकिस्तान सरकारलाही त्याच्या क्षेत्रातील भागात सुविधा पुरवण्याचं आवाहन केलं आहे.

पाकिस्तानही करणार कॉरिडोरचं निर्माणपाकिस्ताननंही या महिन्यात कॉरिडोर बनवण्याचं काम सुरू करणार आहे. इम्रान खान स्वतः याचं भूमिपूजन करणार आहे. कॉरिडोर 2019पर्यंत पूर्ण होणार आहे. पाकिस्तान सरकारनं भारताच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे.