उत्तराखंडमध्ये समान नागरी संहिता लागू करण्यात आली आहे. हे लागू करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे. याबाबत आता उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी देशात लागू करण्याबाबत एक महत्वाचे विधान केले आहे.
कोल्ड प्लेचे लीड सिंगर ख्रिस मार्टिन महाकुंभमध्ये पोहोचले; त्रिवेणी संगमात स्नान करणार
उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले, 'राज्यघटनेच्या कलम ४४ नुसार सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये समान नागरी संहिता लागू करण्यासाठी प्रयत्न करण्याची परवानगी आहे. पण हे काम बराच काळ प्रलंबित होते.
धनखड म्हणाले, आपल्या मनात राजकारण एवढे भिनले आहे की, त्याच्या समोर राष्ट्रवादाला तिलांजली देतानाही आपल्याला काहीच वाटत नाही.
"आपल्यासमोर अनेक आव्हाने आहेत. एक आव्हान म्हणजे लाखो बेकायदेशीर स्थलांतरित आपल्या भूमीवर राहत आहेत. असे लोक आपल्या राष्ट्रवादाशी कधीही जोडले जाणार नाहीत. बेकायदेशीर स्थलांतरित हे लोकशाहीसाठी धोका आहेत. सरकार यावर गांभीर्याने विचार करेल अशी माझी अपेक्षा आहे, असंही जगदीप धनखड म्हणाले.
धनखड म्हणाले की, 'देवभूमी उत्तराखंडने समान नागरी कायदा प्रत्यक्षात आणला आहे. सरकारच्या दूरदृष्टीचे मी कौतुक करतो. संपूर्ण देश असेच कायदे कधी स्वीकारेल हे फक्त काळाची बाब आहे.
विरोधकांवर टीका केली
उपराष्ट्रपती धनखड यांनी यावेळी विरोधकांवर टीका केली. धनखड म्हणाले की, समान नागरी संहितेला कोणी कसे विरोध करू शकते हे मला समजत नाही. अशा लोकांनी संविधान सभेतील वादविवादांबद्दल वाचले पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने हे किती वेळा करण्यास सांगितले आहे ते वाचा,असंही धनखड म्हणाले.
धनखड म्हणाले की, 'काही लोक अज्ञानामुळे समान नागरी संहितेवर टीका करत आहेत. भारतीय संविधानाचा आदेश असलेल्या, आपल्या संविधान निर्मात्यांनी दिलेल्या आदेशानुसार आणि लिंग समानता आणणाऱ्या गोष्टीवर आपण टीका कशी करू शकतो?, असा सवाल त्यांनी केला.