शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पिलिभितच्या लढाईपासून वरुण गांधी चार हात लांब

By गौरीशंकर घाळे | Updated: February 21, 2022 05:44 IST

चारही मतदारसंघांतील राजकीय लढाई तीव्र 

गौरीशंकर घाळे

पिलिभित : रामायण आणि महाभारताचे संदर्भ उत्तर प्रदेशात पावलोपावली मिळत जातात. राजधानी लखनऊला खेटून असलेल्या उन्नाव जिल्ह्याला रामायणाचा संदर्भ आहे. तर, उत्तरेचे पिलिभित श्रीकृष्णाच्या बासरीसाठी प्रसिद्ध आहे. याच पिलिभितमधून एकेकाळी वरूण गांधी यांनी हिंदुत्वाचा राग आळवला होता. पण, सध्याच्या भाजप नेतृत्वाशी त्यांचे सूर फारसे जुळत नाहीत. पिलिभितमधील चारही विधानसभा मतदारसंघातील राजकीय लढाई तीव्र झाली असताना खासदार असलेले वरूण गांधी मात्र सध्या गायब आहेत. 

पिलिभित जिल्ह्यातील चारही जागा २०१७ साली भाजपच्या खात्यात जमा झाल्या. पिलिभित, बरखेडा, पुरनपूर आणि बिसलपूर हे ते चार मतदारसंघ. यावेळी इथली राजकीय लढाई तीव्र बनली आहे. त्यामुळेच भाजप नेत्यांनी इथे प्रचारसभांचा धडाका लावला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या सभा झाल्या. तर, जिल्ह्याच्या राजकारणाची नस ओळखून असलेले केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी निवडणुका जाहीर होण्याच्या आधीपासूनच इथे फेऱ्या वाढवल्या होत्या. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी स्वतः गृहमंत्री अमित शहा यांची सभा आणि पाठोपाठ रोड शो असणार आहे. दुसरीकडे, भाजपचा गड भेदण्यासाठी सपाचे अखिलेश यादवही पिलिभितची वारी करून गेले आहेत. भाजप आणि समाजवादीने चारही जागांवर सगळा जोर लावला आहे. 

पिलिभत विधानसभेचा शहरी भाग वगळता इतर तीन मतदारसंघांचा तोंडवळा ग्रामीण आहे. या भागातून शेतकरी आंदोलनाला चांगलाच पाठिंबा मिळाला होता. जोडीला मोकाट जनावरांची समस्याही स्थानिकांची डोकेदुखी बनली आहे. पण, त्यामुळे वातावरण थेट भाजपच्या विरोधात गेले, असे मात्र नाही. शेतकरी, कामगार वर्गासाठी राज्य सरकारची पेन्शन योजना आणि राशन वितरण भाजपची जमेची बाजू बनली आहे. स्वतः मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनीही राज्याच्या योजनांसह केंद्रीय योजनांच्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांची जंत्री मांडली होती. सपाचा वाढत्या प्रभावाला लाभार्थीच बांध घालतील अशी भाजपला आशा आहे.

सपाचे होते वर्चस्व  या मतदारसंघातून २०१७ पूर्वी सपाचे नेते आणि माजी मंत्री रियाज अहमद तीनवेळा आमदार होते. त्या काळातील सपाचे वर्चस्व पुन्हा नको, असाही एक अंतरप्रवाह जिल्ह्यातून वाहतो आहे. रियाज आज या जगात नाहीत, त्यांचा मुलगा बसपाच्या तिकिटावरून लढतो आहे. तरीही उलटा परिणाम सपाला त्रासदायक बनतो आहे.

टॅग्स :Varun Gandhiवरूण गांधीElectionनिवडणूकUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२