वारकर्यांचे आज ठिय्या आंदोलन
By admin | Updated: July 9, 2015 23:57 IST
पंढरपूर : चंद्रभागेचे वाळवंट १५ दिवस वारकर्यांसाठी खुले ठेवण्यात यावे, यासाठी सरकारने कायद्यात आवश्यक तो बदल करून द्यावा, या मागणीसाठी पुण्याजवळील संगमवाडी येथे शुक्रवारी ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय वारकर्यांनी घेतला आहे. गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या या बैठकीस दिंडी समाज संघटनेचे अध्यक्ष माऊली जळगावकर यांच्यासह सोहळ्याचे विविध मानकरी उपस्थित होते़ संगमवाडी येथे शुक्रवारी राज्यपाल विद्यासागर राव पालखीच्या दर्शनासाठी येणार असल्याने वारकर्यांच्या या निर्णयाला महत्त्व प्राप्त झाले आहे़