जन्माष्टमीनिमित्त साधुग्राममध्ये विविध धार्मिक कार्यक्रम
By admin | Updated: September 4, 2015 21:54 IST
नाशिक : सिंहस्थ पर्वात साधुग्राममधील आखाडे आणि खालशांमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भजन, कीर्तन, प्रवचन, सत्संग आदिबरोबर काही ठिकाणी रात्री दहीहंडीचा कार्यक्रमदेखील होणार आहे.
जन्माष्टमीनिमित्त साधुग्राममध्ये विविध धार्मिक कार्यक्रम
नाशिक : सिंहस्थ पर्वात साधुग्राममधील आखाडे आणि खालशांमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भजन, कीर्तन, प्रवचन, सत्संग आदिबरोबर काही ठिकाणी रात्री दहीहंडीचा कार्यक्रमदेखील होणार आहे.तपोवनातील जनार्दन स्वामी आश्रम परिसरात सेक्टर दोन डी प्लॉट ४९० मध्ये स्वामी अचलानंदगिरी महाराज (जोधपूर) यांचा संत सेवा शिबिर खालसा असून येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट (कोकमठाण) यांच्या वतीने औरंगाबादरोडवरील इंद्रायणी लॉन्स येथे ओम गुरुदेव माऊली, आत्मा मालिक ध्यानपीठ उभारण्यात आले असून श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भजन, सत्संग आदि कार्यक्रम होणार आहेत. त्यानंतर दुपारी संत महंतांच्या उपस्थितीत आत्मसन्मान दिंडी काढण्यात येणार आहे.इस्कॉनच्या वतीने तपोवनात आठवण लॉन्स नजीकच्या हरेकृष्ण आखाड्यात श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त श्रीकृष्णाच्या मूर्तीभोवती फुलांची सजावट व आरास करण्यात येणार असून गोपालकृष्णाची भजने गायली जाणार आहेत. त्याप्रमाणे भाविकांना प्रसाद वाटप करण्यात येणार आहे.याशिवाय चतु:संप्रदाय आखाड्यात श्रीगोपालकृष्ण पूजन, भजन आदि कार्यक्रम होणार असून अन्य खालशात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे.....इन्फो........अहल्यादेवी होळकरांच्या काळातील गोपालकृष्ण मूर्ती झोपाळाइंदूर येथील पंचकुईयाँ खालसाचे महंत लक्ष्मणदास महाराज यांनी सांगितले की, इंदूरमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. यंदा कृष्ण जन्मोत्सवाचा योग हा सिंहस्थ पर्वात आला असून या पूर्वी १९६७ मध्ये कुंभमेळ्यात हा योग आला होता. पंचकुईयॉ खालशात अहल्यादेवी होळकरांच्या काळातील झोपाळा असून त्याची पूजा महामंडलेश्वर गरीबदास महाराज यांच्या हस्ते होणार आहे. तसेच भजन, कीर्तन आदि धार्मिक कार्यक्रमदेखील होणार आहेत, असे महाराज म्हणाले.