शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
2
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
3
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
4
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
5
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
6
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
7
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
8
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
9
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
10
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!
11
दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात, स्वत: बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू
12
भोजपुरी स्टार पवन सिंहची पत्नी ज्योती यांनी भरला नामांकन अर्ज, कुठल्या पक्षाकडून लढणार?
13
EDला सापडले २५० पासपोर्ट, ७ पाकिस्तानी नागरिकांचा शोध सुरू, बंगाल कनेक्शन समोर   
14
"गेल्या १० वर्षात साबणाला हातही लावला नाही"; बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं 'बाथरूम सीक्रेट'
15
१५ वर्षांनी लहान पुतण्यावर जडला २ मुलांच्या आईचा जीव; नकार देताच पोलिसांसमोर भयंकर कृत्य
16
दिवाळीच्या फटाक्यांमुळे कार किंवा बाइकला आग लागली तर इन्शुरन्स क्लेम करू शकता का? जाणून घ्या
17
"युद्ध थांबवण्याची खरी वेळ...!" रशिया-युक्रेन युद्धावर झेलेंस्की यांचं मोठं विधान
18
Diwali Bonus: मुंबई विमानतळावरील कामगारांची दिवाळी दणक्यात, मिळाला 'इतका' बोनस!
19
Laxmi Pujan 2025 Wishes: लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, Facebook, Whatsapp Status द्वारा द्या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा!
20
OLA कंपनीतील कर्मचाऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल, २८ पानी अखेरची चिठ्ठी सापडली; मालकावर FIR दाखल

Coronavirus : धक्कादायक! दुबईहून दिल्लीत पोहोचला कोरोना पॉझिटिव्ह, ट्रेननं वाराणसीला गेल्यानं एकच खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2020 08:14 IST

वाराणसीतील कोरोनाचा असाच एक प्रकार समोर आला आहे. वाराणसीत 30 वर्षीय तरुण कोरोना संक्रमित असल्याचं आढळलं आहे.

लखनऊः कोरोनानं जगभरात थैमान घातलं असून, भारतालाही त्याचा मोठा फटका बसला आहे. भारतात आतापर्यंत 329 लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र सरकारनंही सतर्कतेची पावलं उचलली आहेत. परंतु अजूनही परदेशातून प्रवास करून आलेले भारतीय निष्काळजीपणा करत असल्याचं समोर आलं आहे. वाराणसीतील कोरोनाचा असाच एक प्रकार समोर आला आहे. वाराणसीत 30 वर्षीय तरुण कोरोना संक्रमित असल्याचं आढळलं आहे. विशेष म्हणजे तो 17 मार्चला दुबईहून विमानाने दिल्लीला पोहोचला आणि 18 मार्च रोजी तो  रेल्वेने वाराणसीला आला. तसेच टेम्पोमधून आपल्या गावी गेल्यानं एकच खळबळ उडाली आहे.घशाला त्रास होत असल्यानं तो 19 मार्चला दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयात तपासणी करण्याकरिता गेला होता, तिथून त्याचा तपासणी अहवाल बीएचयूला पाठवण्यात आला. आता तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. दुबईवरून येऊन वाराणसीत ट्रेनमध्ये तो किती जणांच्या संपर्कात आला हे सांगणं कठीण असलं तरी त्या प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. कोरड्या खोकल्याशिवाय या आजारात जास्त लक्षणं निदर्शनास येत नसल्याचंही डॉक्टरांचं म्हणणं आहे. सध्या त्याला दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे. कोरोना पॉझिटिव्ह या रुग्णावर उपचार सुरू आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून जनता कर्फ्यूचं आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आज जनता कर्फ्यूचं आवाहन केलं आहे. रविवारी सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंतही जनतेची संचारबंदी करण्यात आली आहे. या काळात मुंबई व काही शहरांतील उपनगरी सेवा वगळता, एकही रेल्वेगाडी धावणार नाही. बहुतांश विमान उड्डाणे बंद असतील आणि परदेशांतून येणाऱ्या सर्व विमानांना भारतात उतरण्यास शनिवार मध्यरात्रीपासूनच बंदी घालण्यात आली आहे. शिवाय प्रवासी असतील, तरच एसटीच्या बसेस सोडण्यात येतील. कोरोना विषाणूचा संसर्ग एकमेकांच्या जवळ जाण्याने होत असल्यामुळेच लोकांनी गर्दी करू नये, एकमेकांच्या जवळ जाऊ नये आणि घरीच थांबावे, यासाठी पंतप्रधानांनी जनता कर्फ्यूची कल्पना मांडली आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी लोकांनी या कर्फ्यूमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या