शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

वैष्णोदेवीचे दर्शन आता आणखी सोपे, गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी मंदिर बोर्डाने उचलले महत्त्वाचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2024 06:25 IST

Vaishnodevi Mandir: कटरा येथील वैष्णोदेवी मंदिरात दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात. त्यांच्या लांब रांगांचे व्यवस्थापन करण्यासाठी, तसेच गोंधळाची परिस्थिती निर्माण होणे टाळण्यासाठी श्री माता वैष्णोदेवी श्राइन बोर्डाने (एसएमव्हीडीएसबी) महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. 

जम्मू - कटरा येथील वैष्णोदेवी मंदिरात दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात. त्यांच्या लांब रांगांचे व्यवस्थापन करण्यासाठी, तसेच गोंधळाची परिस्थिती निर्माण होणे टाळण्यासाठी श्री माता वैष्णोदेवी श्राइन बोर्ड (एसएमव्हीडीएसबी) कटरा रेल्वे स्थानकावर भाविकांच्या नोंदणीसाठी रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेन्टिफिकेशन (आरएफआयडी) यंत्रणा लवकरच कार्यान्वित करणार आहे. 

एसएमव्हीडीएसबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंशुल गर्ग यांनी सांगितले की, भाविकांची सुरक्षा, तसेच त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देणे, त्यांची गैरसोय टाळणे हे आमच्या देवस्थानाचे कर्तव्य आहे. त्यामुळे भाविकांच्या नोंदणीची ही प्रक्रिया आम्ही कटरा रेल्वे स्थानकावर सुरू करणार आहोत. श्री वैष्णोदेवी मंदिराच्या परिसरात अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अंशुल गर्ग प्रयत्नशील आहेत. वैष्णोदेवीची महती सांगणारा ‘माता की कहानी’ हा लेझर शो वैष्णोदेवी मंदिरापासून जवळच असलेल्या बाणगंगा येथे भाविकांसाठी सुरू करण्याचा विचार आहे. तसेच, वैष्णोदेवी परिसरातील अधकुवारी भागात कोणत्याही वेळेस सुमारे २५०० ते ३००० भाविक सामावले जातील इतक्या सुविधा निर्माण करण्यात येतील.

९५.२२ लाख भाविक२०२३ मध्ये वैष्णोदेवी मंदिरात ९५.२२ लाख भाविक दर्शनासाठी आले होते. या भाविकांच्या संख्येचा उच्चांक होता. माता वैष्णोदेवी भवन येथे सुरू केलेला स्कायवॉक, पार्वती भवनाची केलेली पुनर्बांधणी यामुळे भाविकांच्या वाढत्या संख्येला सामावून घेणे शक्य झाले आहे.

नव्या वैष्णवी भवनाची उभारणी सुरूनव्या वैष्णवी भवनाची उभारणी सुरू असून त्यात दररोज ३०० भाविक राहू शकतील. या इमारतीत भोजनालय, प्रसाधनगृह अशा अनेक सुविधा भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात येतील. अयोध्येतील राममंदिर, उज्जैन येथील महाकालेश्वर धाम, अमृतसर येथील सुवर्णमंदिर यांच्या धर्तीवर वैष्णोदेवी मुख्य भवन, अधकुवारी, दर्शनी देवडी यांच्या दर्शनी भागांत विविध रंगाच्या एलईडी दिव्यांची भव्य रोषणाई करण्यात येणार आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर