वडली खून खटल्याचे कामकाज सुरू
By admin | Updated: March 22, 2016 00:41 IST
जळगाव : जामनेर तालुक्यातील वडली येथील अफजल अब्दुल तडवी याच्या खून खटल्याच्या कामकाजास जिल्हा व सत्र न्यायालयात सुरुवात झाली आहे. सोमवारी या खटल्यात न्यायाधीश कुलकर्णी यांच्या न्यायालयात पहिला साक्षीदार सरदार दिलदार तडवी याची साक्ष नोंदवण्यात आली.
वडली खून खटल्याचे कामकाज सुरू
जळगाव : जामनेर तालुक्यातील वडली येथील अफजल अब्दुल तडवी याच्या खून खटल्याच्या कामकाजास जिल्हा व सत्र न्यायालयात सुरुवात झाली आहे. सोमवारी या खटल्यात न्यायाधीश कुलकर्णी यांच्या न्यायालयात पहिला साक्षीदार सरदार दिलदार तडवी याची साक्ष नोंदवण्यात आली.८ फेबु्रवारी २०१५ रोजी अफजल तडवी हा जांभुळ शिवारात शेळ्या चारण्यासाठी गेला असता, त्याच्या डोक्यावर कुर्हाडीने वार करण्यात आला होता. गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. आरोपीतर्फे ॲड.अनिल नेमाडे कामकाज पाहत आहे.