शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणामुळे देशाची कोरोना साथीविरुद्ध लढण्याची ताकद वाढली- पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 06:05 IST

अनेकांचे प्राण, रोजीरोटीचे झाले रक्षण

नवी दिल्ली : लसीकरण मोहिमेमुळे देशाची कोरोना साथीविरुद्ध लढण्याची ताकद वाढली. त्यामुळे अनेकांचे प्राण व रोजीरोटी यांचे रक्षण झाले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. या लसीकरण मोहिमेला रविवारी एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मोदी यांनी हे वक्तव्य केले. भारतामध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेने कहर केल्यानंतर गेल्या वर्षी १६ जानेवारीला जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरू झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, कोरोना साथीची सुरुवात झाली, तेव्हा या आजाराविषयी कोणालाच फारसे माहीत नव्हते. मात्र देशातील शास्त्रज्ञांनी त्यानंतर काही महिन्यांतच कोरोना प्रतिबंधक लस तयार केली. या लसींमुळे कोरोना साथीविरोधात मुकाबला करण्याची देशाची ताकद वाढली आहे.त्यांनी सांगितले की, कोरोना लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी झटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी वंदन करतो. सर्व डाॅक्टर, नर्स, आरोग्यसेवक यांनी लसीकरणात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली. आरोग्यसेवक दुर्गम भागात जाऊन तेथील लोकांना लस देत आहेत. अशा गोष्टींनीच ही मोहीम यशस्वी झाली. कोरोना साथीच्या काळात देशातील आरोग्ययंत्रणा आणखी सुसज्ज करण्यात आली.७० टक्के लोकांना दिले दोन्ही डोसपात्र गटांतील ७० टक्के लोकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले तर ९१ टक्के लोकांना लसीचा पहिला डोस दिला आहे, असे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी सांगितले. लसीकरण मोहिमेला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त स्वदेशी बनावटीच्या कोव्हॅक्सिन लसीवर काढलेल्या विशेष टपाल तिकिटाचे मांडवीय यांच्या हस्ते अनावरण झाले. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसNarendra Modiनरेंद्र मोदी