शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Vaccination : कर्णधार मोदींच्या नेतृत्वात 100 कोटी लसीकरण, फडणवीसांनी केलं अभिनंदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 16:01 IST

Vaccination : देशामध्ये जवळपास गेल्या  दीड वर्षांपासून कोरोनाने हाहाकार माजवला होता. आता कोरोनाच्या केसेस कमी झाल्या आहेत आणि लसीकरण मोहीम जोरदार सुरू आहे.

ठळक मुद्देदेशामध्ये जवळपास गेल्या  दीड वर्षांपासून कोरोनाने हाहाकार माजवला होता. आता कोरोनाच्या केसेस कमी झाल्या आहेत आणि लसीकरण मोहीम जोरदार सुरू आहे.

नवी दिल्ली - कोरोनाची सुरुवात, तो भयानक काळ, लॉकडाऊन आणि मिशन बिगेन अगेन हे सर्व अनुभवल्यानंतर भारतीयांसह जगभरातील नागरिकांना कोरोनाच्या लसीची कमतरता भासत होती. मात्र, देशातील दोन कंपन्यांनी सुरुवातीच्या काळात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सीन या लसींची निर्मित्ती करून देशावासीयांना मोठा दिलासा दिला. त्यानतंर, भारत सरकारनेही देशात मोफत लसीकरणाची घोषणा करून, लसीकरणाच्या कामाला गती दिली. त्यामुळे, लस कधी येणार, येथून सुरू झालेला प्रवास आज 100 कोटी लसीकरणापर्यंत पोहोचला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या लसीकरणाबद्दल मोदींचे आभार मानले आहेत.

देशामध्ये जवळपास गेल्या  दीड वर्षांपासून कोरोनाने हाहाकार माजवला होता. आता कोरोनाच्या केसेस कमी झाल्या आहेत आणि लसीकरण मोहीम जोरदार सुरू आहे. आजचा दिवस भारतासाठी अत्यंत महत्वाचा आहे. कारण आज भारताने लसीकरणाता इतिहासच रचला आहे. भारताने कोरोना लसीचा 100 कोटी डोसचा आकडा पार केला. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील RML हॉस्पिटलला भेट देखील देणार आहेत. तर, इकडे देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशातील 100 कोटींपेक्षा अधिक जनतेचे आभार मानले आहेत. लसी कधी येणार.. इथून सुरू झालेला आपला प्रवास आज 100 कोटी लसीकरणापर्यंत पोहोचला आहे. कर्णधार नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारताने लसीकरणाचं हे कोटींचं शतक पूर्ण केल्याचं फडणवीस यांनी म्हटलं.  तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही त्यांनी ट्विटरवरुन आभार मानले आहेत. 

आमदार, खासदार, मंत्र्यांनाही उपक्रमात सहभागी होण्याचे आदेश 

मेगा आउटरीच योजनेअंतर्गत भाजपने आपले मंत्री, खासदार, आमदार आणि राष्ट्रीय आणि राज्य कार्यकर्त्यांना देशभरातील विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यास सांगितले आहे. केंद्र सरकार या योजनेतून पुढील वर्षी निवडणुका होणाऱ्या राज्यांवर लक्ष केंद्रित करत आहे. यात राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे उत्तर प्रदेश, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गृहराज्य गुजरात आणि पंजाब असेल. योजनेअंतर्गत मंत्री आणि खासदारांसह भाजप नेते लसीकरण केंद्रांना भेट देतील. तिथे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान केला जाईल.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarendra Modiनरेंद्र मोदी