शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

देशात 2.56 कोटी लोकांना दिली लस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 05:35 IST

गुरुवारी यंदाच्या वर्षीचे सर्वाधिक रुग्ण : १२६ मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : देशात यंदाच्या वर्षीची कोरोनाच्या नव्या रुग्णांची सर्वाधिक संख्या गुरुवारी आढळून आली. या दिवशी २२८५४ नवे रुग्ण सापडले व १२६ जणांचा बळी गेला.  उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या प्रमाणातही वृद्धी होऊन ते १.६८ टक्के झाले आहे. देशात आतापर्यंत २.५६ कोटी लोकांना कोरोना लस देण्यात आली आहे. लसीकरण मोहिमेच्या ४ लाख ७८ हजार सत्रांमध्ये हा पल्ला गाठण्यात आला. गेल्या चोवीस तासांत कोरोनामुळे बळी गेलेल्यांपैकी ८२.५४ टक्के लोक महाराष्ट्रासह सहा राज्यांतील आहेत. याच कालावधीत १९ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोनामुळे एकही जण मरण पावला नाही. 

याआधी २५ डिसेंबर रोजी २३,०६७ इतके कोरोनाचे सर्वाधिक नवे रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर ७६ दिवसांनी पुन्हा या घटनेची पुनरावृत्ती झाली. कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ कोटी १२ लाख ८५ हजार आहे व १ कोटी ९ लाख ३८ हजार जण बरे झाले. या संसर्गाच्या बळींची संख्या १ लाख ५८ हजारांवर पोहोचली आहे, तर उपचाराधीन रुग्णांची संख्या १ लाख ८९ हजारांपेक्षा अधिक आहे. त्यांचेप्रमाण एकूण रुग्णांच्या तुलनेत ९६.९२ टक्के आहे. कोरोना रुग्णांचा मृत्युदर १.४० टक्क्यांवर कायम आहे. बळी गेलेल्यांमध्ये ७० टक्क्यांहून जास्त लोक एकाहून अधिक व्याधींनी ग्रस्त होते.

कोरोनाच्या जादा लसी अमेरिका इतर देशांना देणारअमेरिकेकडील जादा लसी इतर देशांना वाटणार असल्याचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी सांगितले. जग कोरोनापासून सुरक्षित होत नाही तोवर अमेरिकाही सुरक्षित नसेल याची आम्हाला जाण आहे. अमेरिकी नागरिकांना प्राधान्याने लस देऊन जादा लसींचे जगभरात वाटप करू असेही जो बायडेन म्हणाले. अमेरिेकेत कोरोना साथीने त्रस्त झालेल्यांना मदत देण्यासाठी १.९ ट्रिलियन डॉलर निधी अमेरिकी काँग्रेसने मंजूर केला.

वर्षानंतरही साथ आटोक्यात नाहीकोरोनाची साथ जगभरात पसरल्याची अधिकृत घोषणा जागतिक आरोग्य संघटनेने गेल्या वर्षी ११ मार्च रोजी केली होती. त्याला गुरुवारी एक वर्ष पूर्ण झाले असून या कालावधीत साथ आटोक्यात आणणे या संस्थेला शक्य झालेले नाही. कोरोना लसीच्या समन्यायी वाटपासाठी जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या प्रयत्नांना अद्यापी यश आलेले नाही. 

 

टॅग्स :thaneठाणेCorona vaccineकोरोनाची लस