शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

एक सळी आडवी आली आणि ऑगर मशीन बिघडली! संकटे कमी होईनात, मजुर अद्यापही बोगद्यात अडकलेलेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 10:31 IST

uttarkashi tunnel collapse Update: जो पाईप टाकला जात होता तो दहावा होता. त्याचा पुढील भाग चेपला आहे. आता हा चेपलेला भाग कापण्याचे काम सुरु आहे. यापूर्वी ९ पाईप टाकण्यात आले आहेत. 

गेल्या २ आठवड्यांपासून बोगद्याच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या मजुरांवरील संकट काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. आज सकाळपर्यंत या मजुरांपर्यंत पोहोचण्याची तयारी करण्यात आली होती. अॅम्बुलन्स, डॉक्टरांच्या टीम आदी सर्व त्या ठिकाणी तयारीत ठेवण्यात आले होते. परंतू, एक सळी आड आली आणि सर्व प्रयत्न पुन्हा थांबले आहेत. छेद पाडून पाईप टाकणारी मशीनच यामुळे नादुरुस्त झाली आहे. ती दुरुस्त करण्यासाठी दिल्लीवरून सात जणांची टीम पाठविण्यात आली आहे. 

सिलक्यारा टनलमध्ये अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी आता देश-विदेशातील तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. परदेशातून मशीन आणण्यात आल्या आहेत. मोठ्या आकाराचा पाईप टाकून त्याद्वारे या मजुरांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. परंतू, हा पाईप टाकत असताना ऑगर मशीनला बोगद्यातील ३० मीमीची लोखंडी सळई आडवी आली आहे. यामुळे हा पाईपदेखील वाकडा झाला आहे. तसेच मशीनवर लोड आल्याने ती देखील नादुरुस्त झाली आहे. 

रात्रीच्या १ वाजेच्या सुमारास ही सळई पाईपवर आदळली आहे. यामुळे मशीन बंद आहे. सकाळी ८ वाजण्य़ाच्या सुमारास हे काम पूर्ण होऊन आत अडकलेल्या मजुरांना बाहेर काढले जाणार होते. एनडीआरएफच्या टीमने ऑगर मशीनला अडथळा ठरलेली सळी कापली आहे. मशीन दुरुस्त होताच ८०० मीमीचा पाईप आत अडकलेल्या मजुरांपर्यंत पोहोचविला जाणार आहे.

जो पाईप टाकला जात होता तो दहावा होता. त्याचा पुढील भाग चेपला आहे. आता हा चेपलेला भाग कापण्याचे काम सुरु आहे. यापूर्वी ९ पाईप टाकण्यात आले आहेत. दरम्यान, उत्तराखंडचे सीएम पुष्कर सिंह धामी आणि केंद्रीय मंत्री व्हीके सिंह हे देखील सिल्कियारा बोगद्याजवळ पोहोचणार आहेत. धामी उत्तरकाशीमध्ये परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.. ते बोगद्यात सुरू असलेल्या बचाव कार्याचे क्षणोक्षणी अपडेट्स घेत आहेत. केंद्रीय मंत्रीही येथे दाखल झाल्याची माहिती आहे. 

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंड