शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

८० तासांनंतरही मजूर अडकलेले; रेस्क्यूसाठी थायलंड, नॉर्वेची मदत, मोठ्या मशिन्स एअरलिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 08:33 IST

भूस्खलनाने बचावकार्यात अडचणी

उत्तरकाशी : ब्रम्हखल-यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील सिलक्यारा आणि दंदलगावदरम्यानच्या बोगद्यात अडकलेल्या ४० मजुरांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. त्यासाठी नॉर्वे, थायलंड येथील रेस्क्यू टीम बोलावण्याची तयारी उत्तराखंड सरकारकडून केली जात आहे.

दरम्यान, बचावकार्यासाठी मोठमोठ्या यंत्रणा घटनास्थळापर्यंत आणण्यासाठी हवाई दलाच्या हर्क्युलस विमानाने एअरलिफ्ट करण्यात येत आहेत; परंतु, पर्यायी बोगद्याचे काम सुरू असताना अचानक भूस्खलन झाल्याने बचावकार्य थांबवण्यात आले. मंगळवारी रात्री बोगद्यात स्टीलचे पाइप टाकण्यासाठी ड्रिलिंग करण्याचे काम सुरू होते. त्यावेळी अचानक भूस्खलन झाल्याने काम थांबविण्यात आले. तसेच त्यासाठी काम करणारी यंत्रणाही क्षतिग्रस्त झाली.  २५ टनांच्या यंत्रणा घटनास्थळी आणण्यासाठी हवाई दलाची मदत घेण्यात आली. 

ज्युनिअर फुटबॉल टीमला केले होते रेस्क्यू

जुलै २०१८ मध्ये थायलंडच्या चिंग राय प्रांतातील गुहेत अडकलेल्या ज्युनिअर फुटबॉल टीममधील १२ जणांना रेस्क्यू करण्यात आले होते. सर्व खेळाडू ११ ते १६ वर्ष वयोगटातील होते. त्यांच्यासोबत एक प्रशिक्षकही होते. त्यांच्या अनुभवाचा फायदा मजुरांना बाहेर काढण्यासाठी उत्तराखंड सरकार प्रयत्नशील आहे. तसेच नॉर्वे येथे बचावकार्यात तज्ज्ञ असलेल्या एनजीआय एजन्सीचीही मदत घेण्याचे प्रयत्न सरकार पातळीवरून सुरू आहे.

बचावकार्यास विलंब, कामगारांचा रोष

मागील ८० तासांपासून सुरू असलेल्या बचावकार्य अद्याप सुरू आहे. अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यात विलंब होत असल्याने कामगारवर्गाकडून रोष व्यक्त करण्यात आला. पर्यायी बोगद्यासाठी आणलेली यंत्रणा काम करत नसल्याने कामगारांकडून घोषणाबाजी करण्यात आली. स्थानिक पोलिसांकडून त्यांची समजूत काढण्यात आली.

विविध यंत्रणांचीही मदत

उत्तराखंड सरकारकडून बचावकार्यासाठी शक्य ते सर्व पर्याय अवलंबले जात आहे. भारतीय रेल्वे, रेल विकास निगम लिमिटेड, रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्विस लिमिटेड, इरकॉन यासारख्या यंत्रणांची मदत घेतली जात आहे.

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंड