शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता पूर्ण होण्याआधीच आकारला १५० रुपये 'टोल', ५.५ लाख रुपयांना पडला 'टोल का झोल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 12:21 IST

रस्त्याचं बांधकाम चालू असतानाही कार चालकाकडून टोल आकारला जात होता.

देहराडून-

बांधकाम पूर्ण होण्याआधीच टोल आकारणी सुरू करणार्‍या देशातील टोल प्लाझांना स्पष्ट संदेश देत हरिद्वारमधील जिल्हा ग्राहक न्यायालयाने NHAI च्या पुरैनी टोल प्लाझाची देखरेख करणाऱ्या नगीना-काशीपूर प्रकल्पाच्या व्यवस्थापकाला टोल आकारलेले १५० रुपये ग्राहकाला परत करण्याचे आदेश दिले आहेत. रस्त्याचं बांधकाम चालू असतानाही कार चालकाकडून टोल आकारला जात होता. इतकंच नव्हे, तर टोलनाका देखील अधिकृतपणे लोकांसाठी अद्याप खुला झालेला नव्हता. तरीही टोल आकारणी करण्यात आली होती. 

कोर्टाने टोल प्लाझाला याचिका शुल्क आणि विशेष नुकसानभरपाई म्हणून ५.५ लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. याशिवाय, रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत टोलनाके आकारणे बंद करण्याचे आदेश टोलनाक्याला देण्यात आले आहेत. 

३ ऑक्टोबर २०२१ रोजी हरिद्वारचे रहिवासी प्रल्हाद सिंह बिजनौरहून NH-74 मार्गे घरी परतत होते. नांगिया (बिजनौर हद्दीत) येथे नव्यानं उभारलेल्या टोलनाक्यावर त्यांना थांबवण्यात आलं आणि १५० रुपये टोल फी भरण्यास सांगितलं गेलं. ज्यावर त्यांनी आक्षेप घेतला, रस्ता रुंदीकरणाचं काम अद्याप सुरू आहे आणि हा रस्ता अधिकृतपणे लोकांसाठी खुला होणं बाकी आहे. असं असतानाही टोल भरल्यानंतरच वाहनचालकाला तेथून जाऊ देण्यात आलं होतं.

कोर्टात सिंग यांच्या दाव्याला विरोध करताना प्रतिवाद्यांनी कोर्टात युक्तिवाद केला की टोल-प्लाझाशी संबंधित प्रकरणं ग्राहक मंचाच्या कक्षेत येत नाहीत. याशिवाय, हरिद्वार ते नगीना या ७७ किमी आणि नगीना ते काशीपूर या १७० किमी लांबीच्या रुंदीकरणाचं काम दोन टप्प्यात केलं जाईल, असं रस्ता बांधकाम कंपनीनं सांगितलं होतं. त्यात असंही नमूद केलं होतं की आधीच दुसऱ्या मार्गाचं चार-लेन बांधकाम पूर्ण केलेलं आहे आणि एक नोटिफिकेशन जारी केली आहे. जून २०२१ पासून नांगिया प्लाझा येथे टोल शुल्क आकारण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

दरम्यान, नांगियावर टोल प्लाझा लावण्यात आला होता, जो हरिद्वारकडे जाणारा आणि काशीपूरकडे जाणारा या दोन्ही रस्त्यांसाठी काम करतो. सिंग हे हरिद्वारला निघाले होते आणि टोल प्लाझापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या आणि निर्माणाधीन असलेल्या रस्त्यासाठी टोल आकारण्यात आला.

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडtollplazaटोलनाका