शहरं
Join us  
Trending Stories
1
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली!
2
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
3
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
4
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
5
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
6
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
7
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
8
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
9
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
10
Bombay HC: मुंबई उच्च न्यायालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, परिसरात खळबळ!
11
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
12
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
13
भेटण्याची वेळ द्या सर..; प्रियंका गांधींच्या विनंतीला गडकरींचा लगेच होकार, नेमकी काय चर्चा झाली?
14
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
15
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
16
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
17
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
18
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
19
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
20
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
Daily Top 2Weekly Top 5

उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 13:03 IST

Uttarakhand Governor Returns UCC Bill : उत्तराखंडचे राज्यपाल गुरमीत सिंह यांनी धामी सरकारची दोन महत्त्वाची विधेयके तांत्रिक त्रुटींमुळे परत पाठवली आहेत. धर्मांतर विरोधी कायदा आणि UCC मधील दुरुस्ती आता रखडली आहे. वाचा सविस्तर.

उत्तराखंडमधील पुष्कर सिंह धामी सरकारसमोर एक मोठा प्रशासकीय पेच उभा ठाकला आहे. राज्य सरकारने विधानसभेत मंजूर केलेली दोन अत्यंत महत्त्वाची विधेयके—'धर्मांतर विरोधी (सुधारणा) विधेयक २०२५' आणि 'समान नागरी संहिता (UCC) दुरुस्ती विधेयक' राज्यपाल लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंह यांनी तांत्रिक त्रुटींचे कारण देत पुन्हा सरकारकडे पाठवली आहेत.

राजभवन सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या विधेयकांच्या मसुद्यात काही तांत्रिक आणि टायपिंगच्या चुका आढळल्या आहेत. विशेषतः धर्मांतर विरोधी विधेयकात जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली होती, मात्र त्यातील कायदेशीर भाषेबाबत काही हरकती घेण्यात आल्या आहेत. राज्यपालांनी या विधेयकांवर स्वाक्षरी करण्यापूर्वी सरकारला या त्रुटी सुधारून नवीन मसुदा सादर करण्यास सांगितले आहे. आजतकने याबाबतचे वृत्त दिले आहे.

धर्मांतर विरोधी कायद्यात काय होते बदल? धामी सरकारने या कायद्यात अत्यंत कडक शिक्षेची तरतूद केली होती. फसवणूक किंवा बळजबरीने धर्मांतर केल्यास दोषीला जन्मठेपेपर्यंतची शिक्षा आणि १० लाख रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली होती. 

आता पुढे काय? राज्य सरकारने आता हे विधेयक दुरुस्त करण्यासाठी दोन मार्ग निवडले आहेत. एकतर सरकार या त्रुटी सुधारून अध्यादेश काढू शकते किंवा आगामी विधानसभा अधिवेशनात ही विधेयके पुन्हा मंजूर करून राज्यपालांकडे पाठवू शकते. विरोधकांनी मात्र या प्रकरणावरून सरकारवर जोरदार टीका केली असून, घाईघाईत कायदे बनवल्यामुळे ही नामुष्की ओढवल्याचे म्हटले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Uttarakhand Governor returns UCC amendment, anti-conversion bill to government.

Web Summary : Uttarakhand Governor returned the UCC amendment and anti-conversion bill citing technical errors. The government faces a setback, needing to revise and resubmit the drafts, potentially through an ordinance or in the next assembly session. Opposition criticizes the hasty lawmaking process.
टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडUniform Civil Codeसमान नागरी कायदा