शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

Uttarakhand Glacier Burst: हिमनदीचा पूर म्हणजे काय? हिमकडे कधी व का कोसळतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 05:48 IST

उत्तराखंडात रविवारी हिमकडा कोसळून तीन हिमनद्यांना महापूर आला. या प्रयलयात ऋषीगंगा जलविद्युत प्रकल्प वाहून गेला.

उत्तराखंडात रविवारी हिमकडा कोसळून तीन हिमनद्यांना महापूर आला. या प्रयलयात ऋषीगंगा जलविद्युत प्रकल्प वाहून गेला. अनेक घरांचे नुकसान झाले. जीवितहानीही झाली. परंतु ज्यामुळे ही आपत्ती ओढवली त्याचं कारण काय आणि ते कसं घडलं याची माहिती जाणून घेऊ या...हिमकडे कधी व का कोसळतात?हिमकडे कोसळण्याची अनेक कारणे असू शकतात. त्यात मुख्यत्वे हिमकड्याची झीज होणे, पाण्याचा दाब वाढणे, हिमस्खलन किंवा भूस्खलन होणे आणि बर्फाखाली भूकंप होणे इत्यादी कारणांचा समावेश असतो. अचानक पूर येण्यामागे कारण काय?हिमनद्यांना बांध घालून पाणीसाठा केला जातो. मात्र, अचानक हिमकडा कोसळल्याने पूर येऊन पाण्याची पातळी वाढते. अशा परिस्थितीत धरणाचे दरवाजे उघडून अतिरिक्त पाण्याला वाट करून द्यावी लागते. हिमकडा कधीही कोसळू शकतात. त्यामुळे हिमनद्यांना कधी पूर येईल, याचा काही नेम नसतो. सतत सतर्क रहावे लागते.हिमनदीला पूर कशामुळे आला?हिमनदीला लागून असलेला हिमकडा कोसळल्याने धौलीगंगा नदीला महापूर आला. या महापुरात नदी परिसरात असलेल्या जलविद्युत प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले. मोठी जीवितहानी झाल्याची भीतीही व्यक्त होत आहे. हिमकड्याच्या परिसरात एखादा नजीकचा हिमकडा कोसळल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचे असंतुलन निर्माण झाले तर दुसऱ्या हिमकड्यावर त्याचा परिणाम होतो. हिमकडा नदीत कोसळल्यानंतर पाण्याचा वेग एवढा प्रचंड असतो की पाण्याचा हा लोंढा मार्गात येणारी प्रत्येक गोष्ट उद्ध्वस्त करत जातो.तज्ज्ञांचे म्हणणे...   अतिपाऊस वा बर्फ वितळणे, भूकंप, बर्फाची झीज, धरणाची झीज आणि हिमनदीच्या रचनेत अचानक बदल होणे इत्यादी कारणांमुळे हिमकडे कोसळण्याचे प्रकार घडू शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.हिमकडा कोसळल्याने पाण्याचा अतिसंचय झाल्यास अतिरिक्त पाणी सोडण्यात येते. ते तासागणिकही असू शकते वा दिवसागणिकही असू शकते. 

टॅग्स :uttarakhand glacier burstउत्तराखंड हिमकडा