शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: उत्तराखंडमध्ये ढगफुटी; डझनभर घरं, दुकानं जमीनदोस्त झाल्यानं मोठी हानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 22:20 IST

Uttarakhand Devprayag Cloudburst: उत्तराखंडच्या देवप्रयामध्ये ढगफुटी झाल्यानं नदीला पूर; पात्राजवळील दुकानांचं नुकसान

देवप्रयाग: उत्तराखंडच्या देवप्रयागमध्ये ढगफुटी झाल्यानं शांता नदीला पूर आला आहे. त्यामुळे शांती बाजार परिसरात मोठं नुकसान झालं आहे. या ठिकाणी असलेली आयटीआयची तीन मजली इमारत पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहे. तर शांती नदीच्या पात्राजवळ असलेली दहापेक्षा अधिक दुकानं वाहून गेली आहेत. देवप्रयाग नगराहून बस आगाराकडे येणारा रस्ता पूर्णपणे वाहून गेला आहे.  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कर्फ्यू लावण्यात आला आहे. त्यामुळे आयटीआयसह दुकानं बंद होती. त्यामुळे जीवितहानी टळली. आज संध्याकाळी चारच्या सुमारास दशरथ डोंगरावर ढगफुटी झाली. त्यामुळे इथून वाहणाऱ्या शांता नदीच्या पाणी पातळीत अचानक मोठी वाढ झाली. शांता नदी बस आगार परिसरातून वाहत पुढे शांती बाजाराकडून भागीरथीला जाऊन मिळते. शांता नदीला पूर आल्यानं शांती बाजार परिसरात मोठं नुकसान झालं. आयटीआयचं तीन मजली भवन पुरात पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. शांती बाजारात असलेले अनेक दुकानं नदीला आलेल्या पुरात वाहून गेली. नदीवर असलेला पूल, शेजारी असलेला रस्ता पुरात वाहून गेला. नदी पात्राजवळ असलेल्या कपड्यांच्या, मिष्ठान्नाच्या दुकानांचं पुरामुळे मोठं नुकसान झालं. आर्थिक नुकसानीचा आकडा काही कोटींमध्ये असण्याची शक्यता आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समजली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. कोरोना कर्फ्यू नसता, तर या भागात खूप मोठी जीवितहानी झाली असती.