शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

या राज्यात बाहेरील लोकांना खरेदी करता येणार नाही जमीन, सरकारने घेतला मोठा निर्णय, या कारणानं उचललं कठोर पाऊल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 13:22 IST

Uttarakhand News: एकीकडे महाराष्ट्रात परप्रांतियांच्या येणाऱ्या लोंढ्यांवर निर्बंध आणण्याची मागणी होत असतानाच तिकडे उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने एक कठोर निर्णय घेतला आहे. सरकारने सक्त जमीन कायद्याला मान्यता दिली आहे.

एकीकडे महाराष्ट्रात परप्रांतियांच्या येणाऱ्या लोंढ्यांवर निर्बंध आणण्याची मागणी होत असतानाच तिकडे उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने एक कठोर निर्णय घेतला आहे. सरकारने सक्त जमीन कायद्याला मान्यता दिली आहे. तसेच या कायद्याचा संशोधित मसुदा हा विधानसभेच्या अधिवेशनात सभागृहात मांडला जाणार आहे. त्यानंतर बाहेरील लोकांना उत्तराखंडमध्ये शेती आणि हॉर्टिकल्चरसाठी जमीन खरेदी करता येणार नाही. मागच्या दशकभरापासून उत्तराखंडमध्ये शेतजमीन वेगाने वेगळ्या वापरासाठी उपयोगात आणली जात होती. त्यानंतर असा कायदा तयार करण्याची मागणी सुरू झाली होती.

या नव्या कायद्यातील तरतुदीनुसार २०१८ मध्ये रावत सरकारने तयार केलेले सर्व भूमी कायदे रद्द करण्यात आले आहेत. राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये बाहेरील लोक शेती आणि बागायतीसाठी जमीन खरेदी करू शकणार नाही. हरिद्वार आणि उधमसिंह नगर जिल्ह्यांचा समावेश या कायद्यात करण्यात आलेला नाही. पर्वतीय परिसरातील जमिनींवर नव्या पद्धतीने चर्चा होईल. तसेच जिल्हा दंडाधिकारी जमीन खरेदीवर शिक्कामोर्तब करू शकणार नाही. तसेच डेटा सुव्यवस्थित उपलब्ध व्हावा यासाठी जमिनीच्या खरेदी-विक्रीसाठी ऑनलाइन पोर्टल तयार केलं जाईल. तसेच जर कुणी नियम मोडून जमीन खरेदी-विक्री केली तर सरकार ती जमीन आपल्या ताब्यात घेऊ शकेल.

स्वातंत्र्यानंतर उत्तर प्रदेशमधून विभाजन होऊन वेगळं राज्य बनेपर्यंत उत्तराखंडमध्ये जमीन खरेदीवर  कुठलेही निर्बंध नव्हते. एवढंच नाही तर वेगळं राज्य तयार झाल्यानंतरही यावर कुणी आक्षेप घेतला नव्हता. त्यामुळे बाहेरील लोकांची या भागात वर्दळ वाढली आणि ते स्वस्तात जमीन खरेदी करून आपल्याला हवा तसा वापर करू लागले. त्यामुळे स्थानिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. राज्यात पर्यटन मोठ्या प्रमाणात असल्याने बाहेरील लोक फार्म हाऊस, हॉटेल आणि रिसॉर्ट बांधू लागले. त्यामुळे स्थानिकांना शेतीसाठी जमीन कमी पडू लागली. त्यामधूनच या कायद्याची मागणी होऊ लागली.    

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडGovernmentसरकार