उत्तर प्रदेशमधील शिवसेना प्रमुखाने दिले दंगलीचे आदेश?

By admin | Published: March 2, 2016 10:02 AM2016-03-02T10:02:00+5:302016-03-02T10:31:46+5:30

शिवसेनेते उत्तर प्रदेशमधील प्रमुख अनिल सिंह यांच्या संभाषणाची क्लिप सापडली असून त्यात ते शिवसैनिकांला राडा करण्याचे, पंतप्रधान मोदींविरोधात मोहिम उघडण्याचे आदेश देत आहे.

Uttar Pradesh's Chief Minister ordered a riots? | उत्तर प्रदेशमधील शिवसेना प्रमुखाने दिले दंगलीचे आदेश?

उत्तर प्रदेशमधील शिवसेना प्रमुखाने दिले दंगलीचे आदेश?

Next
>ऑनलाइन लोकमत
वाराणसी, दि. २ - फुकटात वडापाव न देणा-या दुकानदाराला केलेली मारहाण असो वा ठाण्यात महिला पोलिसाला शिवीगाळ करून केलेली मारहाण.. सध्या शिवसैनिकांच्या उद्दामपणाची वागणूक हा चर्चा आणि संतापाचा विषय बनला आहे. आणि असे असतानाच शिवसेनेचे उत्तर प्रदेशमधील प्रमुख असलेल्या नेत्याने आपल्या सैनिकाला वेगवेगळ्या ठिकाणी राडे करण्याचा आदेश दिल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
'नवभारत टाइम्स'च्या वृत्तानुसार, त्यांना शिवसेनेचे उत्तर प्रदेशातील प्रमुख अनिल सिंह व शिवसैनिक अरूण पाठक यांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप मिळाली आहे. त्यामध्ये सिंह हे त्या सैनिकाला राडे करून दंगली पेटवा,त तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करा, त्यांच्याविरोधात मोहिम चालवा, असेही सांगत असल्याचे उघड झाल्याचे वृत्तात म्हटले आहे. संसदेत खासदारांनी उत्तर देण्याची मागणी करत, तीच मागणी कायम ठेवा असेही सिंह यांनी म्हटले आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात उत्तर प्रदेशमध्ये मूर्तींच्या विसर्जनावरून झालेल्या वादानंतर काढण्यात आलेल्या निषेध यात्रेचे अरूण पाठक यांनी नेतृत्व केले होते, त्या संदर्भातच हे संभाषण झाले. या प्रकरणामुळे शिवेसेनेच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
ऑडिओ क्लिपमधील आवाज आपलाच असल्याचे पाठक यांनी मान्य केले, मात्र सिंह प्रतिक्रियेसाठी उपलब्ध नव्हते. 
दरम्यान या संभाषणाच्या ऑडिओ क्लिपच्या सत्यासत्यतेची पडताळणी केली जात आहे. ' या ऑडिओ क्लिपची आम्ही चौकशी करत असून त्याची पडताळणीही करण्यात येत आहे. हे प्रकरण अतिशय गंभीर असून त्यात तथ्य आढळल्यास दोषीवर कडक कारवाई करण्यात येईल', असे दलजित सिंह (अतिरिक्त पोलिस महासंचालक, कायदा- सुव्यवस्था) यांनी स्पष्ट केले. 
 

Web Title: Uttar Pradesh's Chief Minister ordered a riots?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.