शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

“हिंदूनो, जर ‘हे’ षडयंत्र समजलं नाही तर नष्ट व्हाल”; महंत नरसिंहानंदांचं पुन्हा वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2021 16:28 IST

उत्तर प्रदेश एटीएसनं मूकबधिर विद्यार्थी आणि गरीब लोकांना पैसे, नोकरी आणि लग्नाचं आमिष दाखवून धर्मांतरण करायला भाग पाडणाऱ्या दोन जणांना अटक केली आहे.

ठळक मुद्देविशेष म्हणजे अटक केलेल्यांपैकी एक मोहम्मद उमर गौतम हा धर्मपरिवर्तन करून मुस्लीम बनला आहेअटक केलेल्या दुसऱ्या व्यक्तीचं नाव मुफ्ती काजी जहांगीर आलम कासमी असं आहे. एक मोठा गट आहे जो हिंदुंचं धर्म परिवर्तन करून त्यांना मुसलमान बनवत आहे.

नवी दिल्ली – उत्तर प्रदेश एटीएसकडून देशाची राजधानी दिल्लीतून धर्म परिवर्तन करणाऱ्या रॅकेटमधील २ जणांना अटक केली आहे. या कारवाईनंतर गाजियाबाद येथील डासना देवी मंदिराचे महंत नरसिंहानंद सरस्वती यांनी मोठं विधान केले आहे. मी आज काशीत आहे. यूपी एटीएसनं जहांगीर आणि उमर गौतम नावाच्या दोन मौलवींना पकडलं आहे. त्यांचे धागेदोरे माझी हत्य करण्यासाठी जे मुस्लीम आले होते त्यांच्याशी जोडले आहेत असा दावा नरसिंहानंद सरस्वती यांनी केला.

महंत नरसिंहानंद सरस्वती म्हणाले की, एक मोठा गट आहे जो हिंदुंचं धर्म परिवर्तन करून त्यांना मुसलमान बनवत आहे. हा गट देशातंर्गत युद्ध करण्यासाठी काम करतोय. हिंदूमधील सर्व लोकांना याची माहिती आहे. परंतु कोणीही चर्चा करत नाही. ज्या मोठ्या प्रमाणात हा गट हिंदू लोकांचे धर्मांतरण करत आहे त्याची सखोल चौकशी करण्यात यावी. हिंदूंविरोधात होणारं षडयंत्र वेळीच ओळखायला हवं. आतापर्यंत लाखो हिंदुंना मुस्लिम बनवण्यात आलं आहे. पण कोणी बोलत नाही. हिंदूना जर हे षडयंत्र समजलं नाही तर ते नष्ट होतील असं त्यांनी म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण?

उत्तर प्रदेश एटीएसनं मूकबधिर विद्यार्थी आणि गरीब लोकांना पैसे, नोकरी आणि लग्नाचं आमिष दाखवून धर्मांतरण करायला भाग पाडणाऱ्या दोन जणांना अटक केली आहे. विशेष म्हणजे अटक केलेल्यांपैकी एक मोहम्मद उमर गौतम हा धर्मपरिवर्तन करून मुस्लीम बनला आहे. त्याच्या वडिलांचे नाव धनराज सिंह गौतम आहे. तर अटक केलेल्या दुसऱ्या व्यक्तीचं नाव मुफ्ती काजी जहांगीर आलम कासमी असं आहे. हे दोघंही दिल्लीच्या जामिया नगर येथे राहणारे आहेत.

“कोरोना मोठं षडयंत्र, मुस्लिमांची वाढती लोकसंख्या विनाशाचं कारण; प्रत्येक हिंदूने ५-६ मुलांना जन्म द्यावा”

प्रत्येक हिंदूने ५-६ मुलांना जन्म द्यावा

अलीकडेच नरसिंहानंद सरस्वती यांनी मुस्लिमांच्या वाढत्या संख्येवर भाष्य केले होते. भारतात मुस्लिमांची वाढती संख्या चिंतेचा विषय आहे. ज्याठिकाणी मुस्लिमांची संख्या वाढली आहे त्याठिकाणी ते इतरांना जिवंत सोडत नाहीत. हिंदू नेत्यांवर भरवसा ठेऊ नका. प्रत्येक हिंदूने कमीत कमी ५ ते ६ मुलांना जन्म द्यायला हवा. ज्यारितीने मुस्लिमांची संख्या वाढतेय ते पाहता महाविनाश होऊ शकतो. प्रत्येक हिंदूला शस्त्रधारी बनण्याची आवश्यकता आहे असंही महंत नरसिंहानंद सरस्वती म्हणाले होते.

नरसिंहानंदांची वादग्रस्त मालिका

डासना मंदिरात पाणी पिण्यासाठी एक मुस्लीम मुलगा आला होता तेव्हा त्याला मारहाण करण्यात आली होती तेव्हा या मंदिराचे महंत असलेले नरसिंहानंद सरस्वती चर्चेत आले होते. त्यावेळी ते म्हणाले होते की, माझ्या समर्थकांनी त्या मुलाला मारलं कारण ते सर्व मुस्लिमांना संशयाच्या नजरेने पाहतात. आमच्या मंदिर परिसरात कोणत्याही मुस्लिमांना प्रवेश दिला जात नाही. मग तो पत्रकार असो वा सरकारी अधिकारी. हे मंदिर सनातन धर्माच्या भक्तांसाठी आहे असं ते म्हणाले होते.   

टॅग्स :HinduहिंदूMuslimमुस्लीमAnti Terrorist Squadएटीएस