शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

Uttar Pradesh Election 2022 : हरदोईत षटकार मारणारा पक्ष बसतो सत्तेच्या गादीवर

By गौरीशंकर घाळे | Updated: February 22, 2022 09:08 IST

Uttar Pradesh Election 2022 : राजभर यांच्यामुळे समाजवादीही तुल्यबळ

गौरीशंकर घाळेहरदोई : हरदोई जिल्ह्यात षटकार ठोकणारा पक्ष उत्तर प्रदेशच्या गादीवर बसतो म्हणतात. राजकारणाच्या बदलत्या समीकरणांत इतके छातीठोक विधान धाडसाचे असले तरी दिशानिदर्शक मानायला वाव आहे. नकाशावर राजधानी लखनऊ आणि उद्योगनगरी कानपूरला लागून असलेला हा जिल्हा. तरीही आर्थिक स्थिती बेताचीच. आकाराने राज्यातील तिसरा मोठा जिल्हा, इतकीच काय ती जमेची बाजू. जिल्ह्यात विधानसभेच्या आठ जागा आहेत. त्यापैकी सहा किंवा जास्त जागा जिंकणारा पक्ष सत्तेत बसतो, अशी आख्यायिका आहे. 

हरदोईतील सात जागांवरचे कमळ फुललेले ठेवण्यासाठी भाजपची धडपड सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आदींच्या प्रचार सभांनी रंगत आणली आहे. तर, दुसरीकडे सपाचे अखिलेश यादव आणि ओमप्रकाश राजभर यांची संयुक्त सभा झाली. 

आपल्या भोजपुरी भाषणात राजभर यांनी भाजप आणि बसपावर चांगलाचा हल्लाबोल केला. राजभर यांच्या पक्षाचे नाव सुहलदेव भारतीय समाज पार्टी. सुभासपा के ओपी राजभर हा इथला त्यांचा शाॅर्टफाॅर्म प्रचलित आहे. ओपी राजभर यांचा पिवळा आणि सपाचा लाल झेंडा एकत्र आल्याने हरदोईचा किल्ला भाजपसाठी काहीसा अवघड बनला आहे. त्यामुळे भाजपनेही जोरदार आघाडी उघडली आहे.

उत्तर प्रदेश आणि इथली जातीय समीकरणे सर्वश्रुत आहेत. हरदोईतही त्याचा प्रभाव आहेच. जातसमूहानुसार बदलणारी राजकीय आवडनिवड इथेही प्रकर्षाने जाणविल्याशिवाय राहत नाही.  बेरोजगारी, मोकाट जनावरे आणि वाहतूक कोंडी या तीन मुद्दयांची चर्चा मात्र जोरात असते. 

काय आहे परिस्थिती?हरदोईत ऊस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. मोकाट जनावरांमुळे त्रस्त आहेत.  शेतजमिनीचा छोटा तुकडाही कुंपणाने बंदिस्त करणे परवडणारे नाही. मोकाट जनावरांनी त्रस्त केले असले तरी उसाला चांगला भाव  मिळाल्याने हा वर्ग खुश आहे. तर महिन्यातून दोनदा मिळणारे राशन आणि पेन्शनची तुटपुंजी वाटणारी रक्कमही भाजपसाठी लाभार्थी नावाचा एकगठ्ठा मतदार तयार करणारी बनली आहे. 

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२Akhilesh Yadavअखिलेश यादवyogi adityanathयोगी आदित्यनाथ