शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशातील पराभवाचे खापर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 01:06 IST

उत्तर प्रदेशातील कैराना लोकसभा व नुरपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकांत भाजपाला पराभवाला सामोरे जावे लागल्याने त्या पक्षाच्या दोन आमदारांनी त्याचे खापर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर फोडले आहे.

लखनौ : उत्तर प्रदेशातील कैराना लोकसभा व नुरपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकांत भाजपाला पराभवाला सामोरे जावे लागल्याने त्या पक्षाच्या दोन आमदारांनी त्याचे खापर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर फोडले आहे. भ्रष्टाचार थांबवण्यात राज्य सरकारला अपयश आले असून, अकार्यक्षम मंत्र्यांना आता तरी हाकलणे, हाच त्यावरील मार्ग आहे, असे या आमदारांनी म्हटले आहे.गोपामाईचे आमदार श्याम प्रकाश यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून या पराभवाबद्दल थेट योगी आदित्यनाथ तसेच रा. स्व. संघ व भाजपाचे नेते यांनाच जबाबदार धरले आहे. त्यांनी लिहिले आहे की, आधी गोरखपूर व फुलपूर आणि आता कैराना आणि नूरपूर... या पराभवाचे आम्हाला दु:ख आहे. नरेंद्र मोदी यांच्या नावाने भाजपाला राज्यात सत्ता मिळाली. पण सरकारची सारी सूत्रे मात्र संघ व संघटना यांच्या हातात असल्याने मुख्यमंत्रीही असहाय्य आहेत.एका वृत्तपत्राशी बोलतानाही श्याम प्रकाश म्हणाले की ही केवळ माझी नव्हे, तर बहुतांशी भाजपा आमदारांची भावना आहे. लोकप्रतिनिधींचे अधिकारी ऐकत नाही. भ्रष्टाचार प्रचंड असून, त्यामुळे लोक नाराज आहेत. मुख्यमंत्री मोकळेपणाने फिरू शकत नाहीत, मनासारखे काम करू शकत नाहीत. अशी स्थिती कायम राहिल्यास भाजपाचे भवितव्य अंधकारमय असेल.दुष्ट शक्तींचा विजय?योगी आदित्यनाथ यांनी मात्र हा विजय दुष्ट शक्तींचा आहे. भ्रष्टाचार करून पैसा जमा केलेल्या मंडळींनी वाईट पद्धत अवलंबली आणि त्याचा विजय झाला. अर्थात, अशा पराभवाने आपण खचून जाणार नाही. या प्रकारे त्यांना सतत जिंकता येणार नाही, असे म्हटले आहे.आपल्याला घरचा रस्ता जनताच दाखवेलबलिया जिल्ह्यातील आमदार सुरेंद्र सिंह यांनीही राज्य सरकारच्या एकूणच कारभाराविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले की आता तरी अकार्यक्षम मंत्र्यांना दूर करायला हवे. त्यांना दूर न केल्यास पुढील निवडणुकामध्ये राज्यातील जनताच भाजपाला घरचा रस्ता दाखवेल. भाजपा नेत्यांनी आता तरी याचा विचार करायला हवा.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथ