शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

Uttar Pradesh Assembly Election: इ है उत्तर प्रदेस! गाय कोणाला खाणार? कोणासोबत जाणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2022 09:40 IST

भल्याभल्यांना चारी मुंड्या चीत करवणाऱ्या, विसंगतीने भरलेल्या आणि निवडणूक लागली, की अख्ख्या देशाला आपल्या तालावर नाचवणाऱ्या एका विलक्षण राज्याची सैर

य्या यहाँ ऐसा ही है. सब लोग गाय को रास्ते पे छोड देते है. सभी गावो में ऐसाही दिखेगा- उत्तर प्रदेशातले शेतकरी आम्हाला सांगत होते. कन्याकुमारी ते श्रीनगर ही देशाची दोन टोके जोडणारा ‘एनएच-४४’ हा महामार्ग मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशातून जातो. राजस्थानही या महामार्गावर आहे. या महामार्गावरून २०१६ साली ‘लोकमत’च्या टीमने प्रवास केला. तेव्हा मध्य प्रदेशातील सिवनी ते उत्तर प्रदेशातील झांसी, आग्रा, मथुरा यादरम्यान अशा गायी पावलोपावली भेटल्या. त्या रस्त्यावर ठाणच मांडून बसल्या होत्या. तुम्ही कितीही हॉर्न वाजवा, त्या हलत नाहीत. या महामार्गावर त्यांचीच सत्ता व त्यांचेच पूर्ण बहुमत.गायीला गोमाता म्हणणारा, गोमांस खाल्ले या संशयावरून माणसांची हत्या करणारा उत्तर प्रदेश जगाला परिचित आहे. पण गायींना रस्त्यावर बेवारस सोडणारा प्रदेश हा तेथे गेल्यावर दिसतो.- ‘असे का?’ हा प्रश्न जेव्हा शेतकऱ्यांना विचारला, तेव्हा उत्तर होते, ‘कौन संभालेगा गाय और सांड को? क्या खिलायेंगे इनको?’ उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीची सध्या तयारी सुरू आहे. अन् आजही तेथे रस्तोरस्ती अशाच गायी व सांड ठाण मांडून बसलेले आहेत. ते मोकाटपणे हिंडताहेत. हे सांड थेट मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रचारसभेत घुसल्याच्या बातम्या तेथील माध्यमांत झळकल्या. सांडांनी एकदा योगींचा ताफाच अडविला. पंजाबमध्ये मोदींचा ताफा अडवला होता तसाच. योगी हे २०२० मध्ये मिर्झापूरला गंगायात्रेला गेले होेते. त्यांच्या यात्रेत मोकाट जनावरांनी बाधा आणू नये म्हणून बांधकाम खात्याच्या अभियंत्यांनी तेथे  रस्सी घेऊनच उभे राहावे व मोकाट जनावरे पकडावीत असा एक शासकीय आदेशच निघाला होता.उत्तर प्रदेशात सांड आता थेट माणसांवर हल्ले करताहेत. त्यात काही शेतकऱ्यांचा मृत्यूही झाला. समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव यांनी यातील काही शेतकऱ्यांच्या मृत्यूच्या बातम्याच सोशल मीडियात शेअर केल्यात. प्रचारसभांतही ते या मृत्यूचे आकडे सांगतात. ही बेवारस जनावरे शेतात घुसून शेतीचे नुकसान करतात म्हणून अनेक शेतकऱ्यांनी शेतांना तारेचे कुंपण घातले आहे. अनेक राज्यांत जशी बिबट्यांची दहशत;  तशी उत्तर प्रदेशात या मोकाट जनावरांची. रात्रीदेखील शेतांना राखण बसण्याची वेळ काही गावांवर आली आहे.  या गायी व सांड आता केवळ रस्त्यांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. ते निवडणुकीतही उतरले आहेत. ‘उत्तर प्रदेश का गुंडाराज खत्म किया’ असा योगी आदित्यनाथ यांचा प्रचारातील मुद्दा आहे. त्याला अखिलेश यांचे उत्तर आहे की ‘उत्तर प्रदेश में अब सांड का आतंक है’. सायकल हे समाजवादी पार्टीचे प्रचारचिन्ह आहे. त्यामुळे ‘बाईस में बाइसिकल’ असा अखिलेश यांचा नारा आहे. ‘सायकल हे गरिबांचे वाहन आहे. सायकल चालविताना कुणाचा मृत्यू झाल्यास आमचे सरकार त्या कुटुंबाला पाच लाख रुपये भरपाई देईल’, असे आश्वासन ते निवडणुकीत देताहत. पण सोबतच त्यांनी आणखीही एक घोषणा केलीय, ‘सांडांच्या हल्ल्यात कुणाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांनाही पाच लाख रुपये देणार’.  गोहत्याबंदीच्या कायद्यावर भाजपने मते मिळवली. आता तोच मुद्दा समाजवादी पार्टीने असा प्रचारात आणला आहे. योगी आदित्यनाथ सरकारने २०२० साली ‘उत्तर प्रदेश गोवध निवारण अध्यादेश’ आणला. त्यामुळे उत्तर प्रदेशात आता गायींची हत्या व तस्करी करणाऱ्यांना दहा वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. पूर्वी ती मर्यादा सात वर्षांची होती. शिक्षा वाढल्याने गायींची हत्या व तस्करी अजामीनपात्र गुन्हा ठरतो. गोहत्या करणाऱ्यांवर गँगस्टर अॅक्टनुसार कारवाई होईल. त्यांची संपत्ती जप्त होईल.  गायींकडे क्रूरतेने बघाल तरी तुरुंगात जाल, असा इशाराच योगींनी दिलाय. कायद्याने गायींना संरक्षण दिले. पण खाटी गायी सांभाळणे शेतकऱ्यांना परवडत नाही म्हणून त्या बेवारस होऊन सर्रास रस्त्यावर येतात. त्याने योगी सरकारची डोकेदुखी वाढली. सरकारने गोशाळा उभारल्या. पण त्या अपुऱ्या आहेत. परिणामी ही बेवारस जनावरे रस्ते, बाजारपेठा, शेतांमध्ये घुसून नासधूस करू लागली. त्यामुळे अपघात वाढले. आगरा-लखनऊ हा ३०२ किलोमीटरचा देशातील सर्वात मोठा एक्स्प्रेसवेही या जनावरांनी वेठीस धरला आहे. योगी सरकारने ही जनावरे पकडून गोशाळेत पाठविण्यासाठी निविदाच काढली. खासगी एजन्सीला प्रती जनावर दोन हजार रुपये मेहनताना. महिन्यात त्यांनी किमान शंभर जनावरे पकडून ती गोशाळेत पाठवायची. तसे झाल्यास त्यांना अधिकचा भत्ता. उद्दिष्ट पूर्ण न केल्यास प्रति जनावर शंभर रुपये दंड अशाच निविदेच्या अटी-शर्ती होत्या. श्रमिकाला दिवसाला जेवढी मजुरी नाही, तेवढा मोबदला एक जनावर पकडण्यासाठी आहे. २०१९ च्या पशुगणनेनुसार उत्तर प्रदेशात रस्त्यावरील जनावरांची संख्या साडेअकरा लाख होती. पैकी साडेसात लाख जनावरे सरकारने गोशाळेत पाठवली किंवा दत्तक तरी दिली. उरलेली चार लाख जनावरे रस्त्यावरच आहेत. त्याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.त्यामुळे ही सर्व जनावरे दोन महिन्यांत गोशाळेत पाठविण्याची योजना तेथील पशुसंवर्धन विभागाने नोव्हेंबर २०२१ मध्ये बनवली. बेवारस जनावरांना कुणी दत्तक घेतल्यास त्यासाठी ‘निराश्रित बेसहारा गोवंश सहभागिता योजना’ आहे. यात दत्तक घेतलेल्या प्रत्येक जनावरामागे सरकार दिवसाला तीस रुपये संबंधित शेतकऱ्याला देणार. पहिल्या टप्प्यातील या योजनेसाठी ११० कोटींचे बजेट आहे. बेवारस जनावरे चारा शोधत रस्त्यावरून आता अशी सरकारी तिजोरीपर्यंत पोहोचली आहेत. उत्तर प्रदेशात गाय राजकीय धुमाकूळ घालते आहे. ती मतदार बनून थेट मतदान केंद्रांत पोहोचते, हाही आजवरचा अनुभव आहे.  तेथे गाय आता कोणाला खाईल याचा भरवसा नाही. 

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२yogi adityanathयोगी आदित्यनाथAkhilesh Yadavअखिलेश यादव