शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

Uttar Pradesh Assembly Election 2022: पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात, मथुरेत EVM झाले खराब

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 08:35 IST

मेरठ येथील 7 जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली असून येथे 26 लाख मतदान आहे. मतदारांचा उत्साह सकाळपासून मतदान केंद्रावर पाहायला मिळत आहे.

लखनौ - देशात 5 राज्यांच्या निवडणुकांचा जोर पाहायला मिळत असून राजकीय वातावरण आरोप-प्रत्यारोपांनी चांगलंच तापलं आहे. त्यात, आज पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली असून उत्तर प्रदेशातील 58 जागांसाठी मतदान होत आहे. त्यासाठी, 623 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात स्वत:ला सिद्ध करणार आहेत. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून थंडीचा जोर असतानाही मतदारराजा केंद्रांवर पोहचत आहे. काही ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड झाल्याचेही निदर्शनास आले आहे. 

मेरठ येथील 7 जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली असून येथे 26 लाख मतदान आहे. मतदारांचा उत्साह सकाळपासून मतदान केंद्रावर पाहायला मिळत आहे. तर, पोलिसांनीही कडक बंदोबस्त ठेवला आहे. अनेक मतदारसंघातील केंद्रावर उमेदवार मंडळीही हजर झाली असून माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधत आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करुन नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केलं आहे. दरम्यान, मतदान शांततेत सुरू असतानाच मथुरा आणि मुझफ्फरनगर येथील केंद्रावर ईव्हीएम बिघाड झाल्याची घटना समोर आली आहे.  मथुरा येथील बलदेव विधानसभा क्षेत्रातील फरह येथे ईव्हीएम मशिन खराब झाले आहे. येथील बुथ क्रमांक 442 वर ईव्हीएम मशिन खराब झाल्याने मतदान प्रक्रिया थांबली आहे. त्यामुळे, मतदारांची केंद्राबाहेर मोठी रांग लागली आहे. दरम्यान, यापूर्वी मुजफ्फरनगरच्या इस्लामिया इंटर कॉलेज पोलींग बुथावरही ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याच माहिती समोर आली आहे. 

दरम्यान, सर्व मतदान केंद्रावर मतदानाला सुरुवात झाली आहे. काही केंद्रावरुन मतदान यंत्रात बिघाड असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. आम्ही तेथील मतदान यंत्र बदलून देत अडचण दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत. सगळीकडे शांततेत मतदान सुरू आहे, असे शामली जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी जसजीत कौर यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :EVM Machineएव्हीएम मशीनElectionनिवडणूकUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२