शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
2
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
3
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
4
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
5
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
6
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
7
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
8
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
9
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
10
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
11
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
12
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
13
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
14
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
15
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
16
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
17
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
18
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
19
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
20
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;

उत्तर प्रदेशात ६ चकमकी, २ गुंड ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 00:15 IST

उत्तर प्रदेश पोलिसांनी रविवारी गेल्या २४ तासांत राज्यातील सहा चकमकींत दोन गुंडांना ठार मारले

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश पोलिसांनी रविवारी गेल्या २४ तासांत राज्यातील सहा चकमकींत दोन गुंडांना ठार मारले. २० मार्च, २०१७ पासून पोलिसांनी सुरू केलेल्या गुंडांविरुद्धच्या या मोहिमेत या दोन जणांसह ४५ जण ठार झाले आहेत. १२ गुंड तर यावर्षीच ठार झाले आहेत.गुंडांचा प्रचंड प्रभाव असलेल्या गाझियाबादेत गेल्या २४ तासांत १८२ गुन्हेगारांना अटक केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. नोएडा, गाझियाबाद, सहारणपूर आणि मुझ्झफरनगरमधील गुन्ह्यांत हवे असलेले अनेक गुन्हेगार पोलिसांनी शनिवारी रात्री सुरू केलेल्या शोध मोहिमेत शोधून काढले. दिल्ली आणि नोएडातील हत्यांप्रकरणी श्रावण चौधरी हवा होता. तो रविवारी सकाळी थोड्याशा गोळीबारा नंतर ठार मारला गेला. त्याच्या अटकेसाठी एक लाख रूपयांचे बक्षीस जाहीर झाले होते. चौधरीकडे एके-४७ अ‍ॅसॉल्ट रायफल आणि ३१५ बोअरची गन सापडली. सहारनपूर येथे चकमकीत सलीम नावाचा गुंड ठार झाला तर त्याचा सोबती पळून गेला. सलीमवर एक लाख रूपयांचे बक्षीस जाहीर झालेले होते.चकमकीच्या ठिकाणाहून पोलिसांनी एक लाख रूपये, मोटारसायकल व पिस्तोल जप्त केले. सरसवा आणि मंडी पोलिस ठाण्यांच्या कर्मचाऱ्यांना गुंड चिलकाना येथून दुचाकीवर येत असल्याचे दिसले. त्यांनी त्यांना थांबण्यास सांगितल्यावर त्यांनी न थांबता पोलिसांवर गोळीबार सुरू केला. सहारनपूरचे उप पोलिस अधीक्षक बबलू कुमार म्हणालेकी, आम्हाला ही घटनासमजताच आम्ही कसूनतपासणी सुरू केली. चकमकीत एक कर्मचारी जखमी झाला. ठार झालेला गुन्हेगार यापूर्वीच्या अनेक गुन्ह्यांत सहभागी होता.