ऑनलाइन लोकमत
कौशंबी (उत्तरप्रदेश), दि. २५ - उत्तरप्रदेशमधील कौशंबी जिल्ह्यात अटसराय स्टेशनजवळ मुरी एक्सप्रेसचे १० डबे रुळावरुन घसरल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाल्याची शक्यता असून काही जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे.
अलाहाबादजवळील टाटानगर येथून जम्मूतावी येथे जाणा-या मुरी एक्सप्रेसचे १० डबे रुळावरुन घसरले. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. अपघाताचे वृत्त समजताच रेल्वेचे पथक मदतकार्यासाठी घटनास्थळी रवाना झाले आहे. या अपघातानंतर घटनास्थवळील रुग्णालयांमधील आपातकालीन कक्ष रिकामे करण्यात आले आहे.