शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

उत्कृष्टतेचा आदर आणि सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 03:03 IST

भारतीय संसदीय लोकशाहीच्या इतिहासात १९ जुलै २०१७चा दिवस सुवर्ण अक्षरात लिहिला गेलाय. देशात पहिल्यांदा मीडिया हाऊस असलेल्या लोकमत वृत्तपत्र समूहाने

- अमिताभ श्रीवास्तवभारतीय संसदीय लोकशाहीच्या इतिहासात १९ जुलै २०१७चा दिवस सुवर्ण अक्षरात लिहिला गेलाय. देशात पहिल्यांदा मीडिया हाऊस असलेल्या लोकमत वृत्तपत्र समूहाने नवी दिल्लीतील विज्ञान भवनात लोकसभा आणि राज्यसभेत आपली कामगिरी व आचरणाने संसदीय लोकशाहीला विशेष प्रतिष्ठा मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाºया सदस्यांचा सन्मान केला. या संसद सदस्यांची कार्यपद्धती नव्या नेतृत्वासाठी मार्गदर्शक आहे. आधी विधिमंडळ गौरव पुरस्कार आणि नंतर लोकमत संसदीय पुरस्कार देण्यामागे लोकमत समूहाची एक रचनात्मक भावना आहे. संसदेत नुसता गोंधळ घालण्यापेक्षा जनतेच्या आशा-आकांक्षांना मूर्त रूप कसे देता येईल, पूर्ण माहितीसह अभ्यासपूर्ण भाषणे कशी केली जातील, विचारांचे आदान-प्रदान कसे होईल, यावर विचार करणे खूपच गरजेचे आहे. संसद आणि विधिमंडळाने लोककल्याणाचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण कायदे बनविले आहेत. परंतु अलिकडील काळात संसद असो वा देशभरातील विधिमंडळ, यामध्ये गंभीर चर्चा, तार्किक वादविवादापेक्षा सभागृह ठप्प पाडणे, चर्चा न होऊ देणे, गोंधळाचा फायदा घेऊन विधेयके पारित करून घेण्याचे प्रकार सातत्याने वाढत आहेत. समाजसुधारक आणि विचारवंतांना जशी या गोष्टींची चिंता आहे आणि देशातील कोट्यवधी नागरिकांनाही त्यांचा अपेक्षाभंग होण्याचे दु:ख आहे. कारण सुखी आयुष्य, अन्न-वस्त्र-निवारा या सारख्या मूलभूत सुविधांच्या पूर्ततेसाठी जनतेच्या सर्व अपेक्षा या सभागृहाशी जुळलेल्या आहेत. अशा स्थितीत देशातील तरुणाईच्या मनात असलेला सभागृहाचा आदर एका क्षणालाही कमी होऊ नये, हेच लोकमत समूहाचे प्रयत्न राहिले आहेत.निरंतर निर्भीड, निष्पक्ष आणि लोकोपयोगी पत्रकारिता करणारा ‘लोकमत’ दलित, पीडित, शोषित, उपेक्षितांच्या हक्कांसाठी नेहमी लढत आला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांविरुद्ध आणि स्वातंत्र्यानंतर जनतेसाठी लढण्याचे व्रत ‘लोकमत’ने परिश्रमपूर्वक जपले आहे. याच क्रमात पुढे संसदेत जनतेच्याआशा-आकांक्षा पूर्ण करणाºया आदर्श लोकप्रतिनिधींचे कार्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘लोकमत संसदीय पुरस्कार’ची योजना करण्यात आली. विज्ञान भवनात आयोजित या कार्यक्रमात उपराष्ट्रपती श्री. हमीद अन्सारी मुख्य अतिथीच्या रूपात तर विविध पक्षांचे वरिष्ठ नेत्यांसोबतच विविध देशांचे राजदूत आणि भारत सरकारचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले होते.