शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेच्या २९ वस्तूंवरील आयात करात केली वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 01:09 IST

भारताच्या काही वस्तूंवर वाढीव आयात कर लावणाऱ्या अमेरिकेला भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले असून, २९ अमेरिकी उत्पादनांवरील आयात करात वाढ केली आहे.

नवी दिल्ली : भारताच्या काही वस्तूंवर वाढीव आयात कर लावणाऱ्या अमेरिकेला भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले असून, २९ अमेरिकी उत्पादनांवरील आयात करात वाढ केली आहे. डाळी, लोह व पोलाद उत्पादने आणि रसायने यांचा त्यात समावेश आहे.आयात करातील ही वाढ ४ आॅगस्टपासून लागू होईल, असे वित्त मंत्रालयाच्या अधिसूचनेत म्हटले आहे. भारत सरकारने याआधीच याची घोषणा केली होती. ती आता प्रत्यक्षात अमलात येईल.अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने आंतरराष्ट्रीय व्यापाराबाबत संरक्षणवादी धोरण स्वीकारून आयात करात मोठी वाढ केली आहे. त्यामुळे युरोपीय संघाने तसेच चीनने अमेरिकी वस्तूंवर वाढीव आयात कर लावला आहे. याचा परिणाम म्हणून व्यापारी युद्धासारखी स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच आता भारतानेही अमेरिकी वस्तूंवर वाढीव आयात कर लावला आहे.>भारताला आर्थिक फटकारोगनिदान घटक द्रव्यांवरील आयात कर दुपटीने वाढवून २० टक्के तर फौंड्री क्षेत्रातील साच्यांच्या बंधकावरील कर १७.५ टक्के केला आहे. लोहावरील आयात कर १५ वरून २७.५० टक्के, तर स्टेनलेस स्टीलवरील कर १५ वरून २२.५० टक्के केला आहे. अमेरिकेने भारतातून आयात होणाºया लोह व अ‍ॅल्युमिनियम उत्पादनांवर आयात कर वाढविला आहे. त्यामुळे भारताला २४.१ कोटी डॉलरचा फटका बसणार आहे. याच्या उत्तरात भारताने ही कारवाई केली.>कशावर किती कर आकारला जाणार?वित्त मंत्रालयाने म्हटले आहे की, अमेरिकेतून आयात होणारे वाटाणे, चणे व मसूर डाळीवरील आयात कर ३० वरून ७० टक्के केला आहे. फोडलेल्या बदामावर आयात कर १०० वरून १२० रुपये इतका होणार आहे. सालासह बदामावरील आयात शुल्क ३५ रुपये किलोवरून ४२ रुपये किलो इतके करण्यात आले आहे. अक्रोडवरील आयात कर ३० टक्क्यांवरून १२० टक्के, सफरचंदावरील कर ५० टक्क्यांवरून ७५ टक्के, बोरिक अ‍ॅसिडवरील कर १७.५० टक्के, फॉस्परिक अ‍ॅसिडवरील कर १० वरून २० टक्के इतका करण्यात आला आहे.