शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

उर्मिला मातोंडकर सरसंघचालक मोहन भागवत यांची पुतणी आहे? जाणून घ्या व्हायरल सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 16:06 IST

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने सक्रिय राजकारणात प्रवेश केल्यापासून सोशल मीडियावर तिच्याविषयी उलटसुटल दावे करण्यात येत आहेत.

मुंबई - प्रख्यात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने नुकताच काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. तिला काँग्रेसकडून उत्तर मुंबई मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र उर्मिला मातोंडकर हिने सक्रिय राजकारणात प्रवेश केल्यापासून सोशल मीडियावर तिच्याविषयी उलटसुटल दावे करण्यात येत आहेत. उर्मिला ही सरसंघचालक मोहन भागवत यांची पुतणी असल्याचा तसेच काश्मिरी तरुण मोहसीन अख्तर मीर याच्यासोबत विवाह केल्यानंतर तिने धर्मपरिवर्तन करून मरियम अख्तर मीर किंवा फरझाना मीर असे नाव धारण केल्याच्याही बातम्या पसरवल्या जात आहेत. मात्र सत्य परिस्थिती वेगळीच आहे.  उर्मिला मातोंडकर ही सरसंघचालक मोहन भागवत यांची पुतणी असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र याबाबत काही प्रसारमाध्यमांनी थेट उर्मिला मातोंडकरकडे विचारणा केली असता तिला हे ऐकून धक्का बसला. आपले आणि सरसंघचालक मोहन भागवत यांचे कोणत्याही प्रकारचे नातेसंबंध असल्याचे तिने फेटाळून लावले. हे म्हणजे सिनेमाच्या कथानकापेक्षाही अकल्पनीय आहे. यात कोणतीही सत्यता नाही, असा दावा तिने केला. तसेच उर्मिलाने काश्मिरी तरुण मोहसीन अख्तर मीर याच्यासोबत विवाह केल्यानंतर धर्मपरिवर्तन करून मरियम अख्तर मीर किंवा फरझाना मीर असे नाव धारण केल्याचे दावेही केले जात आहेत. मात्र उर्मिलाचा पती मोहसीन अख्तर मीर याने हा दावाही फेटाळला आहे. इतर सिने कलाकारांप्रमाणेच तिनेही नाव बदललेले नाही. तसेच माझेही आडनाव आपल्या नावासमोर लावलेले नाही. तसेच तुम्ही माझ्या घरी आलात तर तिथे तुम्हाला मंदिरही आढळेल. त्याबरोबरच माझ्या घरात काम करणाऱ्या व्यक्तींनाही तुम्ही विचारू शकता ते सुद्धा सांगतील की उर्मिलाने धर्मपरिवर्तन केलेले नाही. मात्र असे असले तरी उर्मिला मातोंडकरविषयी सोशल मीडियावर उलटसुटल पोस्ट व्हायरल होत आहेत. पण अधिक पडताळणी केली असता यापैकी बहुतांश पोस्ट खोट्या असल्याचे सिद्ध होत आहे. तसेच तिचे सरसंघचालक मोहन भागवतांशी असलेले नातेसंबंध नसल्याचे आणि तिने धर्मपरिवर्तन करून नाव बदलले नसल्याचेही सिद्ध होत आहे. 

टॅग्स :Urmila Matondkarउर्मिला मातोंडकरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPoliticsराजकारणmumbai-north-pcमुंबई उत्तर