शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

महिला आरक्षण विधेयकासाठी आग्रह; आजपासून संसदेचे विशेष अधिवेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 10:52 IST

नव्या संसद भवनात उद्या प्रवेश, पहिल्या दिवशी जुन्या संसद भवनात अधिवेशन होणार आहे.

नवी दिल्ली : संसदेचे पाच दिवसांचे विशेष अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत सत्ताधारी आणि विरोधकांसह अनेक पक्षांनी महिला आरक्षण विधेयक संसदेत मांडण्याचा आग्रह धरला.

सर्वपक्षीय बैठकीत अनेक नेत्यांनी सांगितले की, दीर्घकाळ प्रलंबित हे विधेयक मांडले जावे आणि ते सर्वांच्या सहमतीने मंजूर होऊ शकते. या विधेयकात लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी एकतृतीयांश जागा राखीव ठेवण्याची तरतूद आहे. काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले की, सर्व विरोधी पक्षांनी संसदेच्या अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्याची मागणी केली आहे. 

भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले, आम्ही सरकारला या संसदेच्या अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्याचे आवाहन करतो. गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर मंगळवारी संसद नवीन इमारतीत स्थलांतरित होणार असल्याचे पटेल यांनी सांगितले.

नव्या संसद भवनात उद्या प्रवेश, पहिल्या दिवशी जुन्या संसद भवनात अधिवेशन होणार आहे. दुसऱ्या दिवशी दि. १९ सप्टेंबर रोजी जुन्या संसद भवनात फोटो सेशन होईल त्यानंतर सकाळी ११ वाजता सेंट्रल हॉलमध्ये कार्यक्रम होईल. त्यानंतर खासदार नव्या संसदेत प्रवेश करतील. नव्या संसदेत १९ सप्टेंबरपासून संसदेचे अधिवेशन सुरु होईल आणि २० सप्टेंबरपासून नियमित सरकारी कामकाज सुरु होईल.

टॅग्स :Parliamentसंसद