शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अनाथाश्रमात बालपण, शिपाई म्हणून नोकरी; आज आहेत IAS अधिकारी; जाणून घ्या, सक्सेस स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2022 12:36 IST

घरची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट होती की शिहाब यांनी वडिलांसोबत बांबूच्या टोपल्या विकायला सुरुवात केली.

अपयशाला आपलं दुर्दैव मानून अनेक लोक प्रयत्न सोडून देतात पण असे अनेक लोक आहेत जे परिस्थितीसमोर खंबीरपणे उभे राहतात आणि जगाला कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे दाखवून देतात. अशा लोकांपैकी एक म्हणजे मोहम्मद अली शिहाब. केरळचे रहिवासी असलेले मोहम्मद शिहाब यांची गोष्ट अत्यंत प्रेरणादायी आहे. अनाथाश्रमात राहणाऱ्या शिहाब यांची यशोगाथा जाणून घेऊया.

मोहम्मद शिहाब यांचा जन्म 15 मार्च 1980 रोजी केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात झाला. शिहाब यांचे जीवन संघर्षाने भरलेले होते. त्यांच्या वडिलांचे नाव कोरोट अली आणि आईचे नाव फातिमा होते. घरची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट होती की शिहाब यांनी वडिलांसोबत बांबूच्या टोपल्या आणि खाऊची पानं विकायला सुरुवात केली. पण याच दरम्यान त्यांच्या वडिलांचं निधन झालं. वडिलांच्या निधनानंतर शिहाब आणि त्यांच्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी आईच्या खांद्यावर आली.

आई शिकलेली नसल्याने तिला कोणतीच नोकरी मिळाली नाही. आपल्या मुलांचं पोट भरून न शकल्याने आणि गरिबीमुळे आईने शिहाब आणि त्यांच्या भावंडांना अनाथाश्रमात सोडलं. पण अनाथाश्रम ही अशी जागा होती जिथे शिहाब यांचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं. अनाथाश्रमात राहताना त्यांचे लक्ष अभ्यासाकडे वळले आणि ते तेथील इतर मुलांपेक्षा हुशार झाले. त्यांनी अनाथाश्रमात 12वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि आपल्या मेहनतीने 2011 मध्ये UPSC मध्ये 226 रँक मिळवून यश मिळवले.

तिसऱ्या प्रयत्नात IAS अधिकारी

तिसर्‍या प्रयत्नात नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करणारे मोहम्मद शिहाब हे सध्या नागालँड कॅडरचे आयएएस अधिकारी आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी UPSC परीक्षेची तयारी करतात पण अनेक कारणांमुळे यश मिळण्यापासून वंचित राहतात. मोहम्मद शिहाब यांचा हा प्रवास त्या सर्व उमेदवारांसाठी एक उत्तम उदाहरण आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.