शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
2
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
3
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
4
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
5
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
6
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
7
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
8
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
9
बाई, हा काय प्रकार... LinkedIn वर फुल-टाइम गर्लफ्रेंडची व्हॅकन्सी, लोक विचारतात सॅलरी किती?
10
सोनं १३०६ रुपयांनी स्वस्त, चांदीही घसरली; पटापट चेक करा कॅरेटनिहाय लेटेस्ट रेट
11
Jara Hatke: अजब प्रथा: 'या' गावात लग्नाआधी तोडले जातात वधूचे दात; पण का??? वाचा 
12
मनोज जरांगे पाटील यांनी दिल्ली गाठली; अमित शाह यांच्याकडे केली मोठी मागणी, नेमके काय घडतेय?
13
IPL Auction 2026 LIVE: केकेआरचा मोठा डाव, कॅमरून ग्रीनपाठोपाठ पतिरानावर लावली विक्रमी बोली
14
Budh Pradosh 2025: इंग्रजी वर्ष २०२५ मधील शेवटचे प्रदोष व्रत; कर्जमुक्ती, संतान प्राप्तीसाठी करा 'हे' उपाय
15
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉसह सरफराज खानला कुणीच दिला नाही भाव; सलग दुसऱ्यांदा 'अनसोल्ड'चा ठपका
16
खळबळजनक! लेकीच्या कस्टडीसाठी पतीने रचला भयंकर प्लॅन; टीव्ही अभिनेत्री पत्नीला केलं किडनॅप
17
नाईट क्लब आग प्रकरणी फरार लुथरा बंधूंना दिल्लीत आणले; थायलंडला पळून गेले होते
18
कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! मार्च २०२६ पूर्वी मिळणार मोठं गिफ्ट, सरकारनं दिली महत्त्वाची माहिती
19
सेकंदात तयार होणारी मॅगी कॅप्सूल खरी की खोटी? ४० मिलियन लोकांनी बघितलेल्या व्हिडीओचं सत्य काय?
20
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' जन्मतारखेच्या लोकांनी पायात काळा धागा बांधू नये; होतो दुष्परिणाम!
Daily Top 2Weekly Top 5

पूजा खेडकर वादानंतर 30 पेक्षा जास्त अधिकारी रडारवर; UPSC ला मिळाल्या तक्रारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2024 19:42 IST

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे 30 हून अधिक अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्रांमध्ये छेडछाड केल्याच्या तक्रारी आल्या आहेत.

UPSC News : काही दिवसांपूर्वी प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकरला बडतर्फ करण्यात आले. दरम्यान, आता अशाप्रकारची आणखी प्रकरणे समोर येऊ शकतात. कारण, पूजा खेडकर प्रकरणानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे (UPSC) 30 हून अधिक अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्रांमध्ये छेडछाड केल्याच्या तक्रारी आल्या आहेत. आयोग लवकरच अशा अधिकाऱ्यांची चौकशी करू शकते. मात्र, यासंदर्भात आयोगाकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

UPSC नागरी सेवा परीक्षा ही देशातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठित परीक्षांपैकी एक आहे. या परीक्षेद्वारे आयएएस, आयपीएस, आयएफएस, आयआरएस इत्यादी अधिकाऱ्यांची निवड केली जाते. देशाच्या विकासकामांची आणि सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी या अधिकाऱ्यांच्या खांद्यावर असते. त्यामुळेच सरकारी विभागातील वरिष्ठ पदांवर हेराफेरी किंवा अन्य मार्गाने निवड होणे खरोखरच चिंताजनक आहे.

30 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?मीडिया रिपोर्ट्सनुसार, पूजा खेडकर वादानंतर यूपीएससीकडे कागदपत्रांमध्ये छेडछाड करुन नोकरी मिळवलेल्या 30 हून अधिक अधिकाऱ्यांच्या तक्रारी आल्या आहेत. निवड झालेल्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रमाणपत्रात आणि इतर तपशीलांमध्ये चुकीची माहिती दिल्याचा दावा करण्यात आला आहे. UPSC ने या तक्रारी कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडे (DoPT) पाठवल्या असून, तपास सुरू केला आहे.

नवीन प्रणाली तयार होणार दुसरीकडे, उमेदवारांकडून अपंगत्वाच्या निकषांचा आणि कोट्याचा गैरवापर टाळण्यासाठी सरकार सक्रियपणे चर्चा करत आहे. या विषयावर अनेक बैठका घेतल्या जात आहेत. कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग (DoPT) आणि LBSNAA दोन्ही या उणीवा दूर करण्यासाठी आणि गंभीर समस्या ओळखण्यासाठी प्रोटोकॉल तयार करत आहेत. नाव बदलण्याची फसवणूक टाळण्यासाठी UPSC ने आपले सॉफ्टवेअर आणि प्रोटोकॉल अपडेट केले आहेत. नवीन प्रणालीमुळे आता उमेदवाराची संपूर्ण माहिती जाणून घेण्यात मोठी मदत होईल.

केंद्राने पूजा खेडकरला तातडीने हटवलेकेंद्र सरकारने बडतर्फ प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकरला भारतीय प्रशासकीय सेवेतून (IAS) तत्काळ कार्यमुक्त केले आहे. सरकारने ओबीसी कोट्याचा गैरवापर केल्याच्या आरोपावरुन पूजा खेडकरवर ही कारवाई केली आहे. यापूर्वी, केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) 31 जुलै रोजी पूजाची उमेदवारी रद्द केली होती. तसेच, तिला भविष्यातील परीक्षांमधूनही वगळण्यात आले आहे.

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगfraudधोकेबाजीGovernmentसरकारjobनोकरी