शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

खंडणी, अपहरण प्रकरणातील आरोपी उत्तर प्रदेशच्या आमदारास मध्यप्रदेशात पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2020 01:27 IST

पत्नी, मुलाविरुद्धही गुन्हा; दोघांना पकडण्यासाठी पोलिसांनी स्थापन केले पथक

आगर माळवा (मध्यप्रदेश)/भादोही (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील एका आमदारास मध्यप्रदेशात पकडण्यात आले आहे. त्याच्यावर अपहरण आणि खंडणीचे आरोप आहेत.विजय मिश्रा, असे या आमदाराचे नाव असून, तो निषाद पार्टीचा ग्यानपूर भादोही मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतो. उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या विनंतीनुसार मध्यप्रदेश पोलिसांकडून त्यास आगर माळवामधील तानोदिया चौकीजवळ ताब्यात घेण्यात आले.आगर माळवाचे एसपी राकेश सागर यांनी पत्रकारांना सांगितले की, आम्हाला उत्तर प्रदेशातील भादोही पोलिसांनी आमदार मिश्रा याला पकडण्यासंदर्भात विनंती केली होती. त्यानुसार आम्ही ही कारवाई केली आहे. तो उज्जैनमार्गे राजस्थानातील कोटा येथे चालला होता. त्याला पकडल्याची माहिती भादोही पोलिसांना देण्यात आली आहे.एका प्रश्नाच्या उत्तरात सागर यांनी सांगितले की, मिश्रा यास आम्ही पकडले आहे. अटक केलेले नाही. आम्ही त्याला भादोही पोलिसांच्या ताब्यात देऊ. पुढील कारवाई भादोही पोलीस करतील.दरम्यान, भादोहीचे एसपी राम बदन यांनी सांगितले की, मिश्रा हा उज्जैनमधील महाकाल मंदिरात दर्शनाला जाणार असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्यानुसार, त्याला पकडण्याची विनंती आम्ही आगर माळवाच्या एसपींना केली होती. त्याला ताब्यात घेण्यासाठी आमचे एक पोलीस पथक मध्यप्रदेशला रवानाही झाले आहे. राम बदन यांनी सांगितले की, आमदार विजय मिश्रा, त्याची पत्नी रामलाली आणि मुलगा विष्णू मिश्रा यांच्याविरुद्ध ४ आॅगस्ट रोजी त्यांचाच एक नातेवाईक कृष्णमोहन तिवारी याने मालमत्ता हडप करणे, तसेच धमकी देण्याची तक्रार दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. त्यांच्याविरुद्ध भा.दं.वि. ३२३, ३४७, ३८७, ४४९ आणि ५0६ कलमान्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तत्पूर्वी, मिश्रा याने एक व्हिडिओ जारी करून ‘आपण ब्राह्मण असून विरोधकांनी आपल्याला फसविण्याचा कट केल्या’चा आरोप केला.मुलासाच्या अटकेस अंतरिम स्थगितीपोलिसांनी सांगितले की, मिश्रा याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांत ७३ गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी त्याला गुंडा अ‍ॅक्ट आणि रासुकासारख्या कडक कायद्यान्वये अटकही झालेली आहे.भादोहीच्या एसपींनी सांगितले की, मिश्रा याची पत्नी आणि मुलगा यांना अटक करण्यासाठी एक पोलीस पथक स्थापन करण्यात आले आहे.मिश्रा याची पत्नी रामलाली मिश्रा ही उत्तर प्रदेश विधान परिषदेची समाजवादी पार्टीची आमदार आहे. तिने जामिनासाठी भादोहीच्या जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश पी.एन. श्रीवास्तव यांनी तो फेटाळून लावला, तसेच तिला एमपी/एमएलए न्यायालयात जाण्यास सांगितले.मिश्रा याची मुलगी रिमा मिश्रा हिने अंतरिम जामिनासाठी आपली आई आणि भावाच्या वतीने अर्ज दाखल केला आहे.सरकारी वकील दिनेश पांडे यांनी सांगितले की, अंतरिम जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत विष्णू मिश्रा यास अटक करण्यात येऊ नये, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पुढील सुनावणी २0 आॅगस्ट रोजी होणार आहे.