शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भारत-चीन संघर्षावरून गदारोळ; संसदेत चर्चेची मागणी अमान्य, विरोधकांकडून सभात्याग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 06:47 IST

राज्यसभेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी चीनच्या आक्रमणाचा मुद्दा उपस्थित केला आणि यावर चर्चा करण्याची मागणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : अरुणाचलच्या तवांग सेक्टरमध्ये भारत व चीनच्या सैनिकांत गत काही दिवसांत झालेल्या झटापटीचा मुद्दा संसदेच्या दोन्ही सभागृहांत बुधवारी पुन्हा उपस्थित झाला. यावर चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली. ही मागणी मान्य न झाल्याने विरोधकांनी दोन्ही सभागृहांतून सभात्याग केला. 

राज्यसभेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी चीनच्या आक्रमणाचा मुद्दा उपस्थित केला आणि यावर चर्चा करण्याची मागणी केली. ते म्हणाले की, आम्ही कालही या मुद्द्यावर नोटीस दिली होती. सभागृहाला अनेक बाबी समजून घ्यायच्या आहेत. 

खरगे यांना रोखलेउपसभापती हरिवंश यांनी खरगे यांना रोखले आणि सांगितले की, आज या विषयावर नोटीस नाही. त्यामुळे यावर चर्चा होऊ शकत नाही. तसेच, संरक्षणमंत्र्यांनी यावर माहिती दिली आहे. याचवेळी विरोधकांनी गदारोळ सुरू केला. त्यानंतर काँग्रेस, तृणमूल, समाजवादी पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल यांच्यासह विरोधी पक्ष सदस्यांनी सभात्याग केला.

१९६२ युद्धावेळीही संसदेत झाली चर्चालोकसभेत काँग्रेसचे नेते अधीररंजन चौधरी यांनी भारत आणि चीन यांच्या सैनिकांतील झटापटीबाबत सभागृहात चर्चा करण्याची मागणी केली. ते म्हणाले की, १९६२ मध्ये युद्धाच्यावेळी संसदेत चर्चा झाली होती. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी १६५ सदस्यांना बोलण्याची संधी दिली होती. लोकसभा अध्यक्ष ओम बिरला म्हणाले की, या विषयावर बीएसीच्या बैठकीत निर्णय होईल. सरकार तवांगच्या मुद्द्यावर चर्चा होऊ देत नाही, असा आरोप करत तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग केला.

टॅग्स :lok sabhaलोकसभाindia china faceoffभारत-चीन तणाव