शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

समान नागरी कायद्याच्या खासगी विधेयकावरून राज्यसभेत गदारोळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2022 06:34 IST

डीएमकेसह टीएमसी, काँग्रेस, सपाचे सदस्य आक्रमक

नवी दिल्ली : भाजपचे खासदार डॉ. किरोडीलाल मीणा यांनी समान नागरी संहिता विधेयक २०२० हे खासगी सदस्य विधेयक आज राज्यसभेत मांडल्यानंतर विरोधकांनी गोंधळ घातला. या खासगी विधेयकामुळे देश बरबाद होईल, असा आरोप विरोधकांनी केला.शुक्रवारी सदस्यांना खासगी विधेयक मांडण्याची संधी मिळते. यानुसार आज भाजपचे डॉ. किरोडीलाल मीणा यांनी भारतात समान नागरी संहिता विधेयक, २०२० या नावाचे खासगी विधेयक मांडले.

सभापतींनी हे विधेयक मांडण्याची परवानगी दिल्याबरोबर डीएमकेचे तिरुची सिवा यांनी आक्षेप घेतला. सिवा यांच्यासह टीएमसीचे डेरेक ओब्रायन यांनीही या विधेयकाला विरोध केला. त्यांनी यावर बोलण्याची संधी मागितली. विधयेक मांडल्यानंतर आपल्याला बोलण्याची संधी मिळेल, असे सभापतींनी सांगितले. त्यानंतर डॉ. मीणा यांनी विधेयक मांडले. परंतु यावर ते काहीच बोलले नाही. 

विधेयकावर चर्चा झालीच नाहीहे विधेयक मांडण्याला एमडीएमकेचे वायको यांनी विरोध दर्शविला. नियम ६७ नुसार आपण नोटीस दिली असून हे विधयेक मांडता येणार नाही, असा दावा त्यांनी यावेळी केला. यावेळी भाजपचे प्रकाश जावडेकर यांनीही एखाद्यावर मत मांडण्याचा अधिकार असल्याचे सांगितले. त्यावर वायको यांनी देशभक्तीचा ठेका काही लोकांनाच दिलेला नाही, असे म्हणत प्रत्युत्तर दिले. या विधेयकांवर चर्चा झालीच नाही.

सर्व पक्षांनी सामूहिक प्रयत्न करावे : गडकरीसमान नागरी कायद्याबद्दल सर्व पक्षांनी सम्यक चर्चा करण्याची आवश्यकता आहे. एका व्यक्तीने चार लग्न करणे हे अनैसर्गिक आहे. सर्व धर्मांना समानतेचा अधिकार आहे. यासंदर्भात सरकार एक समिती स्थापन करणार आहे. यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होईल, असे मंत्री नितीन गडकरी म्हणाले.

विरोधकांची हौदापर्यंत धावसिवा यांना टीएमसी, काँग्रेस, सपा व इतर विरोधी सदस्यांनी समर्थन दिले व विरोधी पक्षाचे सदस्य हौदात आले. सभापती जगदीप धनखड यांनी सदस्यांना जागेवर जाण्याची वारंवार विनंती केली. परंतु सदस्य हौदातून जागेवर गेले नाही. हे विधेयक मताला आल्यानंतर आपण यावर आक्षेप नोंदवा परंतु विधयेक मांडण्याला विरोध करणे योग्य नसल्याचे सांगून सभापती धनखड यांनी विरोधकांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :Parliamentसंसद