शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सीबीआयमध्ये उलथापालथ; वर्मा, अस्थाना यांना बसवले घरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 06:21 IST

भारताची सर्वोच्च तपास संस्था म्हणून दबदब्यासह नावलौकिक असलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) मुख्यालयात मंगळवारी मध्यरात्रीपासून ‘न भूतो’ अशा घडामोडी घडल्या.

- हरिश गुप्ता नवी दिल्ली : भारताची सर्वोच्च तपास संस्था म्हणून दबदब्यासह नावलौकिक असलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) मुख्यालयात मंगळवारी मध्यरात्रीपासून ‘न भूतो’ अशा घडामोडी घडल्या.सीबीआयच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आपसांतील भांडणाला अभूतपूर्व कलाटणी देण्याºया नाट्यमय घडामोडींमुळे संचालक आलोक वर्मा व विशेष संचालक राकेश अस्थाना यांचे अधिकार काढून घेऊ न, त्यांना घरी बसविण्यात आले. त्यानंतर बुधवारी सकाळी संचालक एम. नागेश्वर राव यांनी सीबीआय प्रमुखपदाची सूत्रे हाती घेतली.ओडिशाच्या १९८६ च्या तुकडीतील अधिकारी नागेश्वर राव मध्यरात्री थेट आलोक वर्मा यांच्या ११ व्या मजल्यावरील कार्यालयात पदाची सूत्रे घेण्यास दाखल झाले. सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाºयांचे अधिकार केंद्र सरकारने केंद्रीय दक्षता आयोगाच्या (सीव्हीसी) शिफारशीनुसार काढल्याने नागेश्वर राव यांच्याकडे सूत्रे देण्यास एकही अधिकारी नव्हता.वर्मा, अस्थाना यांना रोखलेबुधवारी सकाळी वर्माव अस्थाना सीबीआयच्या मुख्यालयात गेले असता त्यांना दारापाशीच रोखण्यात आले. तडकाफकडी अधिकार काढून घेतल्याने वर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, तर अस्थाना उदास मनाने घरी परतले. वर्मा यांच्या आव्हान याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होईल.अशा घडल्या हालचालीकेंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने मंगळवारी रात्री ११.४५ वाजता (पान ८ वर)>केंद्राची भूमिका नाही - जेटलीसीबीआयमधील दोन अधिकाºयांच्या संघर्षात केंद्र सरकारची कोणतीही भूमिका नाही. त्यात हस्तक्षेप करण्याचाही सरकारचा इरादा नाही. अशा घटनांबाबत केंद्रीय दक्षता आयोग ही सुपरवायझरी अ‍ॅथॉरिटी आहे. आयोगाची मंगळवारी बैठक झाली. त्यानंतर बुधवारी सरकारने दोन्ही अधिकाºयांना सदर प्रकरणाची चौकशी जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत आलोक वर्मा व राकेश अस्थाना यांचे अधिकार काढून घेतले आहेत, असे प्रतिपादन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी केले.>राफेल चौकशीमुळेच कारवाईसीबीआयचे संचालक आलोक वर्मा राफेल सौद्यातील घोटाळ्याशी संबंधित दस्तावेज तपासत असताना त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. जो या प्रकरणाला हात घालेल, त्याला हटविण्यात येईल, संपविण्यात येईल, असाच स्पष्ट संदेश पंतप्रधानांच्या वर्मा यांच्यावरील कारवाईतून मिळतो. देश व राज्यघटना धोक्यात आहे, असा भीतीवजा इशाराही राहुल गांधी यांनी दिला आहे.