शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

संपुआ सरकारने केदारनाथचे मंदिर बांधू दिले नाही, मोदींचा हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 03:42 IST

मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना तत्कालीन संपुआ सरकारने मी केदारनाथच्या मंदिराची पुनर्बांधणी करू नये यासाठी दबाव आणला होता, या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी हल्लाबोल केला.

केदारनाथ(उत्तराखंड) : मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना तत्कालीन संपुआ सरकारने मी केदारनाथच्या मंदिराची पुनर्बांधणी करू नये यासाठी दबाव आणला होता, या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी हल्लाबोल केला. २०१३ च्या महाप्रलयात हजारो भाविक मृत्युमुखी पडले. केदारनाथचे मंदिर उद्ध्वस्त झाले होते. त्यावेळी मोदींनी या मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी मदत देऊ केली होती.त्यांनी शुक्रवारी केदारनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. या मंदिरात दर्शन घेतल्यामुळे देशसेवेचे बळ मिळाल्याची भावना व्यक्त केली. हिमालय पर्वतराजीतील अतिउंचावरील या मंदिरात रुद्राभिषेक केल्यानंतर ते म्हणाले की, जनसेवा हीच ख-या अर्थाने ईश्वराची सेवा ठरते. केदारपुरी येथे त्यांनी पाच महत्त्वपूर्ण बांधकाम प्रकल्पाचा शिलान्यास केला. भाविकांना उत्तम सेवा.मंदिरांच्या भिंती जतन करण्यासाठी तसेच मंदाकिनी आणि सरस्वती नद्यांवरील घाटांचे बांधकाम. मंदिराला जाणारा रस्ता, आदिगुरू शंकराचार्य यांच्या समाधीची पुनर्बांधणी आदींचा त्यात समावेश आहे. २०१३ मधील महाप्रलयात या मंदिराचे मोठे नुकसान झाले आहे. हे प्रकल्प महत्त्वाकांक्षी आणि खर्चिक असले तरी ते वेळेत पूर्ण करण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)बाबांनी सोपविली जबाबदारी...उत्तराखंड सरकारने मदत स्वीकारण्यास नकार दिल्याने मी निराश झालो होतो. बाबांनी (शिव) आज माझ्यावर ही जबाबदारी सोपविली आहे. बाबांनी अन्य कुणावर नव्हे तर आपल्या पुत्रावर ही जबाबदारी सोपविली आहे, असे उद्गारही त्यांनी काढले. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी गुरूचट्टी येथे काढलेल्या दिवसांचे स्मरणही त्यांनी करवून दिले. ते माझ्या आयुष्यातील महत्त्वाचे क्षण होते. याच भूमीवर बाबांच्या चरणी आयुष्य घालविण्याची माझी इच्छा होती,मात्र बाबांच्या मनात वेगळेच काही होते, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी