शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुकल्याला बिबट्या घेऊन गेला, गावात भीतीचे वातावरण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 18:51 IST

Leopard Attack: पोलिस, वनविभाग, ग्रामस्थ सर्वांनी शोधले, गावाजवळ झाडात आढळला मृतदेह

Leopard Attack: उत्तर प्रदेशातील बलरामपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्रीच्या अंधारात घरात घुसलेल्या बिबट्याने आईच्या कुशीत झोपलेल्या एका अडीच वर्षीय बालकाला खेचून नेले. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली. काही तासांच्या शोधानंतर अखेर मुलाचा मृतदेह गावापासून सुमारे 150 मीटर अंतरावर मिळाला. या घटनेनंतर गावात शोक आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रात्री 2 वाजता घरात घुसला बिबट्या

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना नेवलगंज ग्राम पंचायतातील रेहारपुरवा (झौहना) या वसाहतीत शनिवारी उशिरा रात्री घडली. हरैया थाना क्षेत्रातील बरहवा ग्राम पंचायत, गुरदासपुरवा येथील चनावती नावाची महिला आपल्या एका नातेवाईकाकडे कौटुंबिक कार्यक्रमासाठी गेली होती. रात्री सुमारे 2 वाजता चनावती आपल्या अडीच वर्षांच्या रोहितला कुशीत घेऊन घरात झोपली होती. तेवढ्यात एक बिबट्या घरात शिरला अन् कुशीत झोपलेल्या रोहितला जबड्यात पकडले.

पोलिस, वन विभाग आणि ग्रामस्थांची संयुक्त शोधमोहीम

तेवढ्यात चनावतीला जाग आली आणि त्यांनी मुलाला बिबट्याच्या जबड्यात पाहून किंकाळ्या फोडल्या. घरातील इतर लोक जागे होईपर्यंत बिबट्या मुलाला घेऊन घराबाहेर पळून गेला. घटनेनंतर तात्काळ डायल 112 वर माहिती देण्यात आली. सूचना मिळताच पोलीस पथक आणि वन विभागाची टीम घटनास्थळी पोहोचली. ग्रामस्थांसह संयुक्तपणे शोधकार्य सुरू झाले. शोधादरम्यान, गावाच्या पश्चिमेला सुमारे 150 मीटर अंतरावर झाडात रोहितचा मृतदेह आढळला. मृतदेह मिळताच परिसरात आक्रोश पसरला.

गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

घटनेनंतर संपूर्ण परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोहेलवा वन्यजीव प्रभागातील या भागात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे वन विभागावर सुरक्षा वाढवण्याचा दबाव वाढला आहे.    

English
हिंदी सारांश
Web Title : Leopard snatches child from mother's arms, terrorizes village.

Web Summary : In Uttar Pradesh, a leopard attacked and killed a sleeping two-year-old. The child was taken from his mother's side. Villagers are now living in fear due to increased leopard sightings.
टॅग्स :leopardबिबट्याUttar Pradeshउत्तर प्रदेश