शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

UP Election 2022 : "आम्ही उत्तर प्रदेशात बदल घडवण्याचा प्रयत्न करतोय, पण विरोधकांकडून सुडाचं राजकारण"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 18:59 IST

UP Election 2022 : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्या व्हर्च्युअल रॅलीत साधला अखिलेश यादव यांच्यावर निशाणा.

सध्या उत्तर प्रदेशात निवडणुकीचे (UP Assembly Election) वारे वाहू लागले आहेत. दरम्यान, सोमवारी आपल्या व्हर्च्युअल रॅलीमध्ये (Virtual Rally) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जनचौपाल कार्यक्रमाच्या माध्यमातून केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या कामांची लेखाजोखा जनतेसमोर मांडला. तसंच यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणाही साधला.

"आम्ही उत्तर प्रदेशात बदल आणण्याचे प्रयत्न करत आहोत. परंतु विरोधक सुडाचं राजकारण करत आहेत. विरोधकांनी अशाच लोकांना तिकीट दिलं आहे, ज्याचं आचरणच ते दंगलीच्या मानसिकतेवाले लोक असल्याचे आहे," असं मोदी म्हणाले. जनचौपाल कार्यक्रमाअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शामली, मुजफ्फरनगर, बागपत, सहारनपुर आणि गौतम बुद्ध नगर या ठिकाणच्या मतदारांना संबोधित केलं. गेल्या पाच वर्षांत उत्तर प्रदेशात नव्या शिक्षण संस्था, आयटीआय. नवी वैद्यकीय कॉलेजेस या ठिकाणी खुली झाली. इतकी विद्यापीठंही उभारली गेली, यामागे तरुणांची स्वप्न आणि आकांक्षा असल्याचं त्यांनी नमूद केलं. डबल इंजिनचं सरकार उत्तर प्रदेशचा विकास दुप्पट वेगानं करत आहे. मागील सरकारने आपल्या पाच वर्षात गौतम बुद्ध नगरमध्ये केवळ ७३ घरे बांधली आहेत. या ५ वर्षात योगी सरकारन जवळपास २३ हजार घरं बांधून शहरी गरिबांना दिली आहेत. कुठे केवय़ळ ७३ घरं आणि कुठे २३ हजार घरं, याचा विचार करा. आज उत्तर प्रदेशात एक्सप्रेस वे, विमानतळांची संख्या दुप्पट होत आहे. उत्तर प्रदेश हे देशातील एकमेव राज्य आहे, जिथे ५ शहरांमध्ये मेट्रो आहे आणि ५ शहरांमध्ये काम सुरू आहे, असंही मोदी म्हणाले.

'मध्यम वर्गीयांना नुकसान'उत्तर प्रदेशात राहणारी जनता यापूर्वीच्या सरकारला ओळखतात. त्यांनी भ्रष्टाचार आणि रियल इस्टेट माफियाची अशी युती केली एनसीआरमध्ये हजारो घर खरेदीदारांना आपल्या आयुष्यभराची कमाई खर्च करावी लागली. याचं मोठं नुकसान आपल्या मध्यम वर्गाच्या लोकांना सोसावं लागल्याचंही ते म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२Akhilesh Yadavअखिलेश यादव