शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

निष्काळजीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात 'आरोग्याशी खेळ'; रुग्णांना दिलं एक्सपायर्ड झालेलं दूध 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 16:26 IST

जिल्हा महिला रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना एक्सपायर झालेलं दूध दिल्याचे प्रकरण समोर आले आहे.

नवी दिल्ली - सरकारी रुग्णालयाचा भोंगळ कारभार आता समोर आला आहे. रुग्णांच्या  आरोग्याशी खेळ करण्यात आला असून निष्काळजीपणाचा कळस गाठला आहे. दुधाबाबत मोठा हलगर्जीपणा करण्यात आला. रुग्णांना एक्सपायर्ड झालेलं दूध देण्यात आलं. उत्तर प्रदेशमध्ये ही संतापजनक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बलिया जिल्हा महिला रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना एक्सपायर झालेलं दूध दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. ही धक्कादायक बाब उघडकीस येताच रुग्णालय प्रशासनाने याचा अधिक तपास सुरू केला आहे. 

प्रसूतीसाठी जिल्हा महिला रुग्णालयात दाखल करण्यात येणाऱ्या महिलांच्या आरोग्यासाठी उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने दूध देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याअंतर्गत बलिया जिल्हा महिला रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना दूध देण्याचा ठेका एका फर्मला देण्यात आला होता, मात्र या ठेकेदाराच्या वतीने जिल्हा महिला रुग्णालयात दाखल रुग्णांना एक्सपायरी डेटचे दूध देण्यात येत होते. यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी एक्सपायरी डेटचे दूध पाहून प्रभारी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली.

रुग्णांच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून सीएमएसने याप्रकरणी चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणाची दखल घेण्यात आल्याचे जिल्हा महिला रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी राशिद इमामुद्दीन यांनी सांगितले. चौकशी सुरू करण्यात आली असून, ठेकेदाराकडून खुलासा मागवण्यासोबतच आरोप सिद्ध झाल्यास या फर्मला काळ्या यादीत टाकण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे. याचा अधिक तपास सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलmilkदूध