शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

UP Assembly Election 2022: उत्तर प्रदेशातही 'खेला होबे', ममता बॅनर्जींचा अखिलेश यादवांना जाहीर पाठिंबा; म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 14:56 IST

UP Assembly Election 2022: लखनौमध्ये आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत ममता बॅनर्जींनी अखिलेश यादव यूपीमध्ये 300 पेक्षा जास्त जागा जिंकतील, असा विश्वास व्यक्त केला.

लखनौ: उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्ष मतदारांना आपल्या बाजूने आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या समर्थनार्थ पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज लखनौमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी ममता बॅनर्जींनीअखिलेश यादव यूपीमध्ये 300 पेक्षा जास्त जागा जिंकतील, असा विश्वास व्यक्त केला. तसेच, सपा कार्यकर्त्यांच्या दिशेने फुटबॉल फेकत 'खेल होबे'चा नारा दिला.

'भाजपने अनेक लोकांचा जीव घेतला'यावेळी ममता बॅनर्जी म्हणाल्या की, केंद्र सरकारने एनआरसीच्या वेळी यूपीमध्ये चकमकीच्या नावाखाली कितीतरी लोकांना मारले. इतिहास बदलण्याचे काम भाजपने केले आहे. भाजपने शहीद ज्योती नष्ट केल्या. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपली राज्यघटना लिहील, आज भाजप त्याच्याशी खेळत आहे. त्या पुढे म्हणाल्या, बनावट चकमकी करुन लोकांना मारण्याची काम भाजपने केले. आज सकाळी ब्राह्मण समाजातील लोक मला भेटायला आले होते. तुम्ही आल्यावर आम्ही अखिलेश यादव यांना पूर्ण पाठिंबा देऊ, असे त्यांनी सांगितल्याचे ममता म्हणाल्या. 

'मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांना ठेचले'त्या पुढे म्हणतात, आमचे शेतकरी आंदोलन करत होते आणि भाजपच्या मंत्र्याच्या मुलाने शेतकर्‍यांना ठेचून मारले. यासाठी भाजपने शेतकऱ्यांची माफी मागावी. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, यूपीमध्ये कोविडमध्ये लोक मरत होते, तेव्हा तुम्ही मुख्यमंत्री योगी कुठे होता? ज्यांचे मृतदेह तुम्ही गंगेत टाकायला भाग पाडले त्या लोकांच्या कुटुंबीयांची माफी मागा. पीएम मोदी म्हणतात, आम्ही यूपीला पैसे दिले. तुम्ही तुमच्या खिशातून पैसे दिलेत का? हा सर्व पैसा जनतेचा आहे, असंही त्या म्हणाल्या.

'ममता दीदींचे आभार मानतो'-अखिलेशतर, यावेळी अखिलेश यादव म्हणाले की, 'ममता बॅनर्जी यांनी सत्यमेव जयतेचा आदर्श देशासमोर ठेवला आहे. त्यांनी सर्व जातीयवादी शक्तींना पराभूत करण्याचे काम केले. बंगालमध्ये जी ऐतिहासिक लढाई लढली त्याबद्दल मी ममता दीदींचे आणि बंगालच्या जनतेचे आभार मानतो. आमच्याकडे गंगा-जमुनी तहजीब आहे, ते पुढे नेण्याचे कामही बंगालच्या जनतेने केले.'

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२Akhilesh Yadavअखिलेश यादवMamata Banerjeeममता बॅनर्जी