नवी दिल्ली : भारतात २०२२ मध्ये झालेल्या एकूण आत्महत्यांपैकी तब्बल ७२ टक्के आत्महत्या पुरुषांनी केल्याचा धक्कादायक अहवाल नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी) प्रसिद्ध केला आहे. या पार्श्वभूमीवर मानसिक आरोग्य तज्ज्ञांनी पुरुषांच्या मानसिक आरोग्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज अधोरेखित केली आहे.
मानसिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. ज्योती कपूर यांचे म्हणणे आहे की, “लहानपणापासूनच पुरुषांना कमजोरी दडपण्याची शिकवण दिली जाते. त्यामुळे पुरुष मनातली घुसमट बोलून दाखवत नाहीत. यातून आत्महत्येसारखे परिणाम उद्भवतात. घर असो की कार्यस्थळ-भावना मोकळेपणाने व्यक्त करता येईल, असे सुरक्षित वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे.
५२.४% विवाहित पुरुषांनी घेतला हिंसेचा अनुभवहरयाणातील ग्रामीण भागात झालेल्या एका अभ्यासानुसार, ५२.४ टक्के विवाहित पुरुषांनी लिंगाधारित हिंसेचा अनुभव घेतल्याचे समोर आले आहे.मानसोपचारतज्ज्ञ डॉ. श्वेता शर्मा म्हणाल्या, “पुरुष जर हिंसा सहन करत असतील, खोट्या आरोपांना तोंड देत असतील, तरीही उपहास किंवा अविश्वासाच्या भीतीने मौन बाळगतात.
डेटा सांगतोय काय?१.६४ लाख आत्महत्या - 2022त्यांपैकी ७२% पुरुषहरयाणा सर्व्हे : ५२.४% विवाहित पुरुषांनी लिंगाधारित हिंसा अनुभवली५३.२% बलात्कार केस (२०१३-१४): खोट्या निघाल्यासमाज समजूतदार व्हावाडॉ. प्रीती सिंह यांचे म्हणणे आहे की, “२०१३-१४ मधील एका अभ्यासात, बलात्काराचे नोंदवलेले ५३.२ टक्के प्रकरणे खोटे असल्याचे आढळले. अशा खोट्या आरोपांनी पुरुषांवर खोल मानसिक आघात होतो – ज्यातून नैराश्य, चिंता आणि दीर्घकालीन भावनिक आघात उद्भवतो.ही अबोल कहाणी आहे जी क्वचितच ऐकू येते - एकाकी पुरुष, वेदना सोसत जगतात. आता समाज लिंगतटस्थ, भावनिकदृष्ट्या समजूतदार व्हावा.”