शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
3
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
4
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
5
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
6
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
7
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
8
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
9
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
10
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
11
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
12
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
13
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
14
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
15
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती
16
विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला?
17
शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे!
18
मायक्रोसॉफ्टमध्ये मोठी कपात होणार! ९००० हून अधिक कर्मचाऱ्यांना फटका बसणार?
19
यशस्वी जैस्वालची सेंच्युरी हुकली! पण एका डावात अनेक विक्रम; हिटमॅन रोहित शर्मालाही टाकले मागे
20
खतरनाक इनस्विंग! स्टायलिश अंदाजात बॉल सोडला अन् 'क्लीन बोल्ड' होऊन तंबूत परतला (VIDEO)

२०१४ पर्यंतचे अनधिकृत ले-आऊट होणार नियमित -- भाग १

By admin | Updated: January 30, 2015 21:11 IST

नासुप्र देणार मालकी पट्टे : गडकरींची नासुप्रला तीन महिन्यांची मुदत नागपूर : प्रचलित कायद्यानुसार २००१ पर्यंतचे अनधिकृत ले-आऊट नियमित करण्याचे निश्चित झाले आहे. परंतु गेल्या १४ वर्षात शहरात झपाट्याने अनधिकृत ले-आऊटवर बांधकामे झाली आहेत. त्यामुळे २०१४ पर्यंतच्या सर्व अनधिकृत ले -आऊटना एकाच वेळी योग्यपणे नियमित करण्याच्या तयारीत राज्य सरकार ...


नासुप्र देणार मालकी पट्टे : गडकरींची नासुप्रला तीन महिन्यांची मुदत
नागपूर : प्रचलित कायद्यानुसार २००१ पर्यंतचे अनधिकृत ले-आऊट नियमित करण्याचे निश्चित झाले आहे. परंतु गेल्या १४ वर्षात शहरात झपाट्याने अनधिकृत ले-आऊटवर बांधकामे झाली आहेत. त्यामुळे २०१४ पर्यंतच्या सर्व अनधिकृत ले -आऊटना एकाच वेळी योग्यपणे नियमित करण्याच्या तयारीत राज्य सरकार आहे. यासाठी नागपूर सुधार प्रन्यासला तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. त्याचप्रकारे झोपडपट्टीवासीयांना मालकी हक्काचे पट्टे देण्याची जबाबदारीसुद्धा नासुप्रवर सोपविण्यात आली आहे. यासाठीही नासुप्रला तीन महिन्यांची वेळ देण्यात आली आहे.
शुक्रवारी केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली नासुप्रच्या मुख्यालयात बैठक घेण्यात आली. बैठकीत ऊर्जामंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, महापौर प्रवीण दटके, आ. कृष्णा खोपडे, आ. सुधाकर देशमुख, आ. डॉ. मिलिंद माने, आ. सुधाकर कोहळे, आ. विकास कुंभारे, मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर आदी उपस्थित होते.
बैठकीनंतर पालकमंत्री बावनकुळे यांनी पत्रकारांशी चर्चा करतांना सांगितले की, अनधिकृत ले-आऊटांची संख्या शहरात झपाट्याने वाढली आहे. त्यावर पक्की घरे सुद्धा बांधण्यात आली आहेत. २०१४ पर्यंत मोठ्या प्रमाणावर बांधकाम झाले आहेत. त्यामुळे अनधिकृत ले-आऊटांना एकाचवेळी नियमित करण्याचा मानस नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. राज्य शासनाच्या स्तरावर यासाठी आवश्यक असलेले नियम-कायदे केले जातील. त्यासाठी कॅबिनेटची मंजुरीसुद्धा घेण्यात येईल. अधिकाधिक लोकांना लाभ पोहोचवणे हाच शासनाचा मुख्य उद्देश आहे. या बैठकीचा मुख्य अजेंडाही अनधिकृत ले-आऊटांना नियमित करणे आणि झोपडपट्ट्यांच्या वितरणाचा होता. ५७२-१९०० ले-आऊटमध्ये मूलभूत सुविधांचा विकास करण्याचे निर्देशसुद्धा देण्यात आले आहेत. त्यानंतर या ले-आऊटांना महापालिकेकडे हँडओव्हर करावे लागतील.