शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

ट्रम्प यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2020 06:46 IST

लष्करासह विविध दलांच्या जवानांवर जबाबदारी

नवी दिल्ली : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारत भेटीवर येत असून, ते दिल्लीतील मौर्या हॉटेलमध्ये थांबणार आहेत. त्यामुळे या हॉटेलसह परिसरात अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. तसेच, ट्रम्प ज्या मार्गाने जाणार आहेत त्याची सुरक्षा यंंत्रणांकडून कसून तपासणी केली जात आहे. लष्करासह विविध दलांच्या जवानांवरही जबाबदारी देण्यात आली आहे.भारतीय विविध सुरक्षा यंत्रणा या अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांसोबत काम करीत आहेत. ऊंच इमारतींवर एनएसजीचे ड्रोन विरोधी पथक, विशिष्ट कमांडो, पतंग पकडणारे पथक, श्वानांचे पथक, शार्प शूटर्स आदींना तैनात करण्यात आले आहे. हॉटेलकडे येणाऱ्या आणि जाणाºया रस्त्यांवर पराक्रम ही वाहने सज्ज ठेवण्यात आली आहेत. सुरक्षेसाठी सहा जिल्ह्यातील पोलिसांना पाचारण करण्यात आले आहे.त्याशिवाय केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या जवळपास ४० तुकड्याही रुजू झाल्या आहेत. सरदार पटेल मार्गावर रात्रीच्या वेळीही स्पष्ट दिसू शकेल अशा उच्चक्षमतेचे शेकडो सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. २४ तास त्याची निगराणी केली जाणार आहे. याच मार्गावर हे हॉटेल आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांनी अधिक खबरदारी घेण्याचे काम सुरू केले आहे. हल्लाविरोधी पथकही तैनात करण्यात आले आहे. विविध स्तरावरील ही व्यवस्था असून ज्या रस्त्यावरुन ट्रम्प जाणार आहेत त्याच्या दुतर्फा बॅरिकेडसच्या दोन रांगा तैनात करण्यात आल्या आहेत.एक कोटी खर्चपाच वर्षांपूर्वी जेव्हा तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आले होते त्यावेळी दिल्ली पोलिसांनी ६०५ सीसीटीव्ही कॅमेरे भाड्याने आणून लावले होते. त्यासाठी तब्बल एक कोटी रुपये एवढा खर्च आला होता.शाळा मार्गावर नजरदिल्ली सरकारही विविध संस्थांच्या माध्यमातून काम करीत आहे. डोनाल्ड यांच्या पत्नी मेलानिया या दिल्लीतील शाळेला भेट देणार असल्याने त्या शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यांवरही कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. सुरक्षा यंत्रणांच्या निर्देशानुसार रस्त्यातील झाडांची तोड करण्यात आली आहे. ठिकठिकाणी साध्या वेशातील पोलीस हजर राहणार आहेत. अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांबाबत बैठकही झाली आहे.हॉटेलला वेढा : हॉटेलच्या ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा असणार आहे. दिल्ली पोलिसांच्या सुरक्षा विभागाचे अधिकारी व कर्मचारी हे अमेरिकेच्या सिक्रेट सर्व्हिस सोबत अंतर्गत सुरक्षेचा जबाबदारी सांभाळत आहेत. तर, हॉटेलची लॉबी, पार्किंग, लॉन, पूल हा दुसरा स्तर आहे. आणि तिसऱ्या टप्प्यात जिल्हा पोलीस आहेत. हॉटेलसमोर मोठी हिरवी जमीन आहे. तेथेही सुरक्षारक्षक राहणार आहेत. शेजारच्या ताज पॅलेस हॉटेलमध्येही सुरक्षारक्षक राहतील. ज्या सूटमध्ये ट्रम्प राहणार आहेत. तेथे हॉटेलच्या बहुतांश कर्मचाऱ्यांना जाण्यास परवानगी राहणार नाही. गेल्या दोन आठवड्यापासून हॉटेलच्या ठिकाणी बंदोबस्त आहे. एनएसजी कमांडो, दिल्ली पोलीस हे नियमितपणे विविध इमारतींच्या गच्चीवर पहारा देत आहेत. अमेरिकन दूतावासाचे अधिकारीही या सर्व तयारीवर नजर ठेवून आहेत. ट्रम्प ज्यावेळी हॉटेलमध्ये राहतील त्यावेळी अन्य ग्राहकांसाठी हॉटेल त्यावेळी बंद असेल. या हॉटेलमधील सर्वच्या सर्व ४३८ खोल्या दौºयासाठी बुक करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्प