शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली विमानतळावर सापडली बेवारस बॅग; आरडीएक्सचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 06:25 IST

प्रवाशांमध्ये घबराट

नवी दिल्ली : दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी मध्यरात्री एक बेवारस बॅग सापडली असून, त्यामध्ये आरडीएक्स असल्याचा संशय आहे. त्यामुळे प्रवाशांत घबराट निर्माण झाली असून, विमानतळावरील बंदोबस्त अधिक कडक करण्यात आला आहे.या विमानतळाच्या टर्मिनल-३च्या प्रवेशद्वाराजवळ काळ्या रंगाची बेवारस बॅग सीआयएसएफच्या एका जवानाला आढळून आली. त्यानंतर या बॅगेची स्फोटकेशोधक यंत्राने, तसेच श्वानपथकाद्वारे तपासणी करून ती दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात आली. या बॅगेत आरडीएक्स किंवा आयईडीही असावे, असा सुरक्षा यंत्रणांना कयास आहे. मात्र, याबाबत नेमकी माहिती शनिवारीच कळू शकेल, असे सूत्रांनी सांगितले. दिल्ली विमानतळावर बेवारस स्थितीत एक बॅग ठेवण्यात आली असल्याचा दूरध्वनी गुरुवारी मध्यरात्रीनंतर आला. त्यानंतर सीआयएसएफ व दिल्ली पोलिसांनी वेगाने हालचाल करून टर्मिनल-३ येथून ही बॅग ताब्यात घेतली. त्या बॅगेतील स्फोटकांचीतज्ज्ञांच्या मदतीने तपासणी करण्यात आली.विमानतळाची तपासणीबेवारस बॅग सापडल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी काही काळ प्रवाशांना विमानतळाबाहेर जाण्यास मनाई केली होती. संपूर्ण विमानतळाची तपासणी करण्यात आल्यानंतरच शुक्रवारी पहाटे चारला प्रवाशांना विमानतळाबाहेर जाऊ देण्यात आले. या परिसरातील रस्त्यांवरही नाकाबंदी करण्यात आली होती.

दिल्ली विमानतळावर तीन टर्मिनल असून, त्यातील टर्मिनल-३ वरून आंतरराष्ट्रीय विमानांची ये-जा होते. प्रचंड सुरक्षा व्यवस्था असूनही टर्मिनल-३च्या प्रवेशद्वारापर्यंत ही बॅग कशी आणली गेली याचाही तपास पोलीस करीत आहेत.

टॅग्स :delhiदिल्लीAirportविमानतळ