शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठांत आता ऑगस्टमध्ये प्रवेश प्रक्रिया, सप्टेंबरमध्ये सत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 05:27 IST

केंद्रीय मानव संसाधनमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी बुधवारी उशिरा या संदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) स्थापन केलेल्या कुहाड समितीच्या शिफारशींना मान्यता दिली आहे.

एस के गुप्ता नवी दिल्ली : कोविड-१९ मुळे विद्यापीठांचे शैक्षणिक कॅलेंडर २०२० व २०२१ वर्षांसाठी दीड महिना पुढे सरकले आहे. नवीन शैक्षणिक सत्रासाठीची प्रवेश प्रक्रिया जूनऐवजी आॅगस्ट महिन्यात तर शैक्षणिक सत्र एक सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. केंद्रीय मानव संसाधनमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी बुधवारी उशिरा या संदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) स्थापन केलेल्या कुहाड समितीच्या शिफारशींना मान्यता दिली आहे. यूजीसीचे देशातील मान्यताप्राप्त ८०० विद्यापीठांना हे नवे शैक्षणिक कॅलेंडर लागू झाले आहे.शिफारशी लागू करायच्या आधी बुधवारी निशंक यांच्या अध्यक्षतेखाली येथे प्रदीर्घ बैठक झाली. यावेळी एचआरडी सचिव (उच्चशिक्षण) अमित खरे, यूजीसीचे अध्यक्ष प्रो. डी. पी. सिंह, यूजीसीचे सचिव प्रा. रजनीश जैन आणि शैक्षणिक कॅलेंडरसाठी शिफारशींसाठी स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष व हरयाणा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. आर. सी. कुहाड उपस्थित होते.मानव संसाधन विकास मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ ला सांगितले की, या नव्या शैक्षणिक सत्राची सुरुवात आणि परीक्षांच्या आयोजनासाठीच्या कुहाड समितीच्या शिफारशी लागू करण्याचे आदेश दिले गेले आहेत.विद्यापीठांत आठवड्यातील पाच दिवसांऐवजी सहा दिवस शैक्षणिक कामकाज करण्यास सांगितले आहे. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचा प्रश्न आहे तेथे समितीने म्हटले आहे की, लॉकडाऊनचे दिवस विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे गृहीत धरले जावेत.>चालू शैक्षणिक वर्ष २०२० साठी शैक्षणिक वेळापत्रक१६ मार्च ते १५ मे २०२० पर्यंत ई लर्निंगच्या माध्यमातून अभ्यास.३१ मे २०२० पासून विद्यार्थ्यांकडून असाइन्मेंट , प्रोजेक्ट रिपोर्ट, इंटर्नशिप रिपोर्ट मागविण्याची प्रक्रिया आॅनलाईन पूर्ण करावीउन्हाळी सुट्या या १ जून ते ३० जून दरम्यान असतील१ जुलै ते ३१ जुलै २०२० दरम्यानपरीक्षा होतील३१ जुलै ते १४ आॅगस्टपर्यंत उत्तरपत्रिका तपासणी व निकाल घोषित करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.>शिफारशीनुसार नवीन शैक्षणिक वर्षासाठी वेळापत्रक१ आॅगस्ट २०२० ते ३१ आॅगस्ट २०२० दरम्यान प्रवेशप्रक्रिया.१ आॅगस्ट २०२० पासून द्वितीय व तृतीय वषार्चे, तर १ सप्टेंबर पासून नवीन.शैक्षणिक वर्षांचे वर्ग सुरु करण्यात यावेत.१ जानेवारी २०२१ पासून २५ जानेवारी २०२१ पर्यंत परीक्षा घेण्यात याव्यात.२७ जानेवारी २०२१ पासून पुन्हा वर्ग सुरु होतील आणि २१ जून २०२१ पर्यंत येतील.१ जुलै ते ३० जुलै दरम्यान उन्हाळी सुटी दिली जाईल आणि २ आॅगस्ट २०२१ पासून दुसºया स्ट्रेस प्रारंभ करण्यात यावा.