शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांच्या एकीसाठी सोनिया गांधी मैदानात, राजकारणात अजूनही सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 02:21 IST

सोनिया गांधी यांनी आपले पुत्र राहुल गांधी यांच्या हाती काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे दिली असली, तरी त्या राजकारणातून अजिबात निवृत्त झालेल्या नाहीत. विरोधी पक्षांच्या ऐक्यासाठी काँग्रेसतर्फे त्याच प्रयत्न करतील, असे स्पष्टपणे दिसत आहे.

- हरिश गुप्ता नवी दिल्ली : सोनिया गांधी यांनी आपले पुत्र राहुल गांधी यांच्या हाती काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे दिली असली, तरी त्या राजकारणातून अजिबात निवृत्त झालेल्या नाहीत. विरोधी पक्षांच्या ऐक्यासाठी काँग्रेसतर्फे त्याच प्रयत्न करतील, असे स्पष्टपणे दिसत आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी सोमवारी झालेल्या विरोधी नेत्यांच्या बैठकीत हे स्पष्ट झाले. बैठकीला उपस्थित असलेल्या गुलाम नबी आझाद व आनंद शर्मा या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी सांगितले की, सोनिया गांधी याच काँग्रेस संसदीय पक्षाच्या यापुढेही अध्यक्ष राहणार आहेत आणि विरोधी ऐक्यासाठी त्या प्रयत्न करीत राहतील.विरोधकांची पुढील बैठक १ फेब्रुवारी रोजी होणार असून, बहुधा त्या बैठकीला स्वत: सोनिया गांधी उपस्थित राहणार आहेत. मात्र,ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही. या आधी आॅगस्ट महिन्यात सोनिया गांधी यांनी विरोधकांचीजी बैठक बोलावली होती, तिला पवार हजर नव्हते.अनेक जण उपस्थितआजच्या बैठकीला सोनिया गांधी वा राहुल गांधी यांना बोलावण्यात आले नव्हते. मात्र, पवार व राहुल गांधी यांचे फोनवर बोलणे आधीच झाले होते. शरद यादव, फारुख अब्दुल्ला, राजू शेट्टी, भाकपचे डी. राजा, माकपचे सीताराम येचुरी दिल्लीबाहेर असल्याने, त्यांचे प्रतिनिधी के. टी. रंगराजन तसेच राष्ट्रवादीचे प्रफुल पटेल, सुप्रिया सुळे, माजिद मेमन हजर होते. मात्र, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, राजद वा बसपाचे प्रतिनिधी उपस्थित नव्हते. 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीPoliticsराजकारणIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस