शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 16:33 IST

लग्नाआधी अचानक वधूची तब्येत बिघडली. पण कुटुंबाने शुभ मुहूर्त वाया जाऊ दिला नाही.

मध्य प्रदेशच्या राजगड जिल्ह्यातील ब्यावरा  शहरात अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने एक अनोखा विवाहसोहळा पाहायला मिळाला. लग्नाआधी अचानक वधूची तब्येत बिघडली. पण कुटुंबाने शुभ मुहूर्त वाया जाऊ दिला नाही. त्यांनी थेट रुग्णालयाचं रूपांतरच लग्नमंडपात केलं. या लग्नाने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं.

ब्यावरा येथील परमसिटी कॉलनीतील रहिवासी जगदीश सिंह सिकरवार यांचा भाचा आदित्य सिंहचं लग्न कुंभराज येथील रहिवासी नंदिनीशी ठरलं होतं. हे लग्न अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कुंभराजजवळील पुरुषोत्तमपुरा गावात होणार होतं. पण लग्नाच्या पाच दिवस आधी नंदिनीची तब्येत अचानक बिघडली. तिला बेवार येथील पंजाबी नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आलं, जिथे डॉक्टरांनी तिला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. 

नवरीची तब्येत आणि लग्नाचा शुभ मुहूर्त अशा दोन्ही गोष्टीची कुटुंबीयांना काळजी वाटत होती. डॉ. जे.के. पंजाबी म्हणाले की, नंदिनी जास्त वेळ बसू शकत नव्हती, म्हणून कुटुंबाने त्यांचा सल्ला घेतला आणि रुग्णालयातच लग्न करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला दोन्ही कुटुंबांची संमती होती. लग्नाच्या दिवशी नवरदेव आदित्य सिंह बँड-बाजा घेऊन थेट पंजाबी नर्सिंग होममध्ये पोहोचला. 

लग्नाचा मंडप रुग्णालयातच सजवण्यात आला होता, विधी पूर्ण झाले. नवरदेवाने नवरीला उचलून घेत सप्तपदी घेतल्या. या दृश्याने तिथे उपस्थित असलेल्या सर्वांचेच डोळे पाणावले. परिस्थिती कशीही असली तरी त्यातून मार्ग काढा असा संदेश या लग्नाने सर्वांना दिला आहे. या अनोख्या लग्नाची सर्वत्र आता जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशmarriageलग्न