शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढचे उपराष्ट्रपती कोण? मतदान संपले, थोड्याच वेळात मतमोजणी सुरु होणार
2
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
3
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
4
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
5
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
6
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
7
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
8
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
9
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
10
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या
11
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
12
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
13
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
14
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
15
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
16
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज
17
दृष्टिहीन वडिलांसोबत भीक मागायची लेक; अभ्यासात हुशार, परिस्थितीवर मात करत बदललं नशीब
18
करिश्माच्या मुलांचा सावत्र आईवर फसवणुकीचा आरोप, संजय कपूरच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीमध्ये मागितला वाटा
19
सामान्य चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगमध्ये काय फरक आहे? जाणून घ्या...
20
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली

लहानग्यांसोबत गुगल डुडलची अनोखी होळी

By admin | Updated: March 13, 2017 07:44 IST

यंदाही गुगलनं स्पेशल डुडल तयार करून लहानग्यांसोबत होळी खेळली आहे

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 13 - देशभरात फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होळीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. यानंतर पुढे पाच दिवस वेगवेगळे उत्सव साजरा होत असतात. दुसऱ्या दिवशी धुळवड असल्यानं अनेक जण या होळीच्या रंगात न्हाऊन निघतात. मात्र उत्सवाचा महत्त्वाचा भाग म्हणजे होळी पेटवणे. होळी म्हणजे थंडीच्या दिवसात उष्णता देणाऱ्या अग्नीचं केलेलं स्वागत असून, त्यानंतरच वसंत ॠतूचे आगमन होते.देशभरात साज-या होणा-या होळीच्या दिवशी आनंदोत्सव साजरा केला जातोय. वेगवेगळ्या देशात भारतीय लोक होळीच्या दिवशी रंगांची उधळण करतात. अशात गुगल मागे राहिलं असतं तर नवलच म्हणायचं. दरवर्षीप्रमाणे यंदाही गुगलनं स्पेशल डुडल तयार करून लहानग्यांसोबत होळी खेळली आहे. गुगलचं पेज ओपन केल्यानंतर रंगात न्हाऊन निघालेलं डुडल नजरेस पडतं. गुगलवर लहानग्यांची टोळी रंगांची उधळण करत असल्याचं या डुडलमधून पाहायला मिळतं आहे. विशेष म्हणजे गुगलकडून या डुडलचा एक व्हिडीओही व्हायरल करण्यात आला आहे. त्यात सर्वांना होळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. व्हिडीओत लिहिलं आहे की, आम्ही होळीच्या शुभेच्छा देतोय, हिंदूंचा होळीचा सण भारत आणि नेपाळमध्ये मोठ्या उत्साहास साजरा केला जातो. आम्ही तुम्हाला 2017 या वर्षांत प्रेम आणि शांती नांदत राहण्याच्या शुभेच्छा देतो.(गुगल डुडलवर झळकले डॉ. आंबेडकर)तत्पूर्वी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२४व्या जयंतीदिनी मंगळवारी गुगलने होमपेजवर विशेष डुडलच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन केले होते. भारताचा स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, प्रमुख सण, घटना, व्यक्ती यांना गुगलने नेहमीच विशेष डुडलच्या माध्यमातून सन्मान दिला गेला होता.