शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2020 21:25 IST

सुरेश अंगडी यांना उपचारासाठी दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले होते, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे आज निधन झालं आहे. बुधवारी वयाच्या 65व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोना संसर्ग झाल्याची माहिती समोर आली होती. सुरेश अंगडी यांना उपचारासाठी दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले होते, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.या वृत्तामुळे त्यांचे कुटुंब आणि मोदी मंत्रिमंडळात शोककळा पसरली आहे. बेळगाव मतदारसंघातून १७व्या लोकसभेवर भाजपातर्फे ते निवडून गेले होते. मोदी यांच्या दुसऱ्या सरकारमध्ये ते रेल्वे राज्यमंत्री आहेत.अनेक राजकारण्यांनी अंगडींच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला. केंद्रीय मंत्री यांच्या निधनाबद्दल कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनी दु: ख व्यक्त केले. ते म्हणाले, "अंगडीजी नेहमी हसत होते. मला ही दु:खद बातमी ऐकून फारच दुःख झाले", असे त्यांनी ट्विट केले. तर भाजपा नेते संबित पात्रा यांनी त्यांच्या निधनाबद्दल ट्विट करत दुःख व्यक्त केले.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत दुःख व्यक्त केलं आहे. अंगडी यांनी पक्षाला कर्नाटकात मजबूत केले. कामासाठी स्वतःला वाहून घेतलेले खासदार आणि ते प्रभावी मंत्री होते. त्यांचंही कामही कौतुकास्पद होते. त्यांचा मित्र परिवार आणि कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे, ओम शांती, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी दुःख व्यक्त केलं आहे.